४६ वी वार्षिक सभा खेळीमेळीत
करवीर :
यशवंत सहकारी बँकेची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सांगितला.
यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले ग्रामीण कार्य क्षेत्र असणाऱ्या व सर्वसामान्यांची एक कुटुंब एक बँक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. बँकेस ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगिरी मधून बँको ब्ल्यू रिबन २०२० या पुरस्कारासाठी बँकेची निवड झाली.बँकेला गतवर्षी ढोबळ नफा २ कोटी ४५ हजार रुपये राहिला अशी माहिती सांगण्यात आली.
बँकेने अल्पावधीतच २०० कोटी व्यवसायाकडे झेप घेतली आहे. रिझर्व बँकेचे सक्षम तेचे सर्व निकष पूर्ण केले असून,बँकिंग क्षेत्रात वाढती स्पर्धा असतानाही ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेने स्वतःचे डाटा सेंटर सह, सर्व ग्राहकांना एटीएम, एनईएफटी, आरटीजीएस ,फास्टॅग, डिजिटल सेवा दिलेल्या आहेत.अल्पावधितच मोबाईल बँकिंग सेवा कार्यान्वित होत असून सर्व ग्राहकांनी आपले व्यवहार बँकेमार्फत करावेत असे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी केले.
बँकेच्या ठेवी १२० कोटी ६२ लाख, कर्जे ७९ कोटी ६७ लाख, भागभांडवल चार कोटी ९४ लाख, एकूण व्यवसाय २०० कोटी २९ लाख झाला आहे. चार वर्षात ८० कोटीचा व्यवसाय वाढवून २०० कोटीचा टप्पा गाठला आहे. सलग दहा वर्षे बँकेचा एनपीए शून्य टक्के आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुमारे ८० तरुणांना कर्ज देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे असे सांगण्यात आले.
सभासद संजय पाटील बी. आर. पाटील यांनी त्यांनी गंगाजळीत वाढ का झाली, ऑडिट रिपोर्ट मागून ही दिला जात नाही.चालू वर्षी नफा-तोटा पत्रक मध्ये जादा खर्च का झाला असे प्रश्न उपस्थित केले.अमर पाटील यांनी, गंगाजळी मध्ये वाढ झाली, गेल्या वर्षीपेक्षा खर्चात वाढ झाली आहे,असे प्रश्न विचारून पोट नियम दुरुस्ती काय केली याचे वाचन करावे अशी मागणी केली.
महादेव चौगुले यांनी सभासदांच्या फाटक्या नोटा व मळकट नोटा बँकेत जमा करून घ्यावे अशी मागणी केली. बी.बी. पाटील, सदाशिव शेलार यांनी प्रश्न विचारले.
शेतकरी संघटनेचे पी . जी. पाटील यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला बँकेच्या वतीने पाठिंबा जाहीर केला.
उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. कांबळे, सभासद, उपस्थित होते.