श्रीपतरावदादा बँकेला 3 कोटी 22 लाखाचा नफा : आमदार पी.एन.पाटील
(श्रीपतरावदादा सहकारी बँक, राजीवजी सहकारी सुत गिरणी व निवृत्ती तालुका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत)

कोल्हापूर :

श्रीपतरावदादा बँकेने शेतकऱ्यांसह विविध घटकांसाठी अनेक योजना राबवून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला आहे. सभासदांसह ग्राहकांचे हित जोपासले असून दहा टक्के लाभांश देणार आहे. प्रगतीपथावर घोडदौड करणाऱ्या या बँकेला ३ कोटी २२ लाख रुपये नफा झाला असल्याचे प्रतिपादन बँकेचे संस्थापक आमदार पी. एन . पाटील सडोलीकर यांनी केले .

फुलेवाडी येथील अमृत माल्टिपर्पज कार्यालयात श्रीपतरावदादा सहकारी बँक, राजीवजी सहकारी सुत गिरणी व निवृत्ती तालुका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. यावेळी राजीवजी सुतगिरण कर्जमुक्त केल्याबदल अध्यक्ष राहुल पाटील व आमदार पी. एन. पाटील यांचा सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भारत पाटील भुयेकर यांचा सत्कार करण्यात आला .

श्रीपतराव दादा बँकेची सभा अध्यक्ष राजेश पी . पाटील सडोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली . इतिवृत्तांताचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी एस बी दिंडे यांनी केले . यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील यांनी बँकेने शेतकरी सुशिक्षित बेकार शेतकरी व विविध घटकांसाठी विविध योजना राबवल्याचे सांगितले .

राजीवजी सहकारी सुतगिरणीची वार्षिक सभा अध्यक्ष राहुल पी . पाटील सडोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . इतिवृत्तांत व अहवाल वाचन सरव्यवस्थापक एस एस तानुगडे यांनी केले . यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील यांनी शासनाने अडचणीतील सुतगिरण्यांसाठी विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी केली .

निवृत्ती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा अध्यक्ष आप्पासाहेब माने यांच्या अध्यक्षते खाली पार पडली . अहवाल वाचन व्यवस्थापक सर्जेराव पाटील यांनी केले . संघाला अहवाल सालात साडेनऊ लाख रुपये नफा झाला आहे . यावेळी निवृत्ती तालुका भाजीपाला संघाची वार्षिक सभा संपन्न झाली .

यावेळी सुतगिरणीचे उपाध्यक्ष, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग पाटील सावर्डेकर, बँकेचे उपाध्यक्ष गणपतराव पाटील, संघाचे उपाध्यक्ष बी.एच.पाटील, सर्व संस्थांचे संचालक तसेच गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक पी. डी . धुंदरे ,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर, माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, भोगावती चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, शिवाजीराव कवठेकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्रा . डॉ . सुनील खराडे यांनी केले .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!