करवीर :
बाचणी (ता.करवीर) ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पदी वैशाली मच्छिंद्र साळवी यांची तर उपसरपंच पदी वासंती नामदेव कारंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ए.एच. गोंदील, ग्रामसेवक अमोल काजवे यांनी काम पाहिले. निवडीनंतर समर्थकांनी साध्या पध्दतीने निवडीचा विजय साजरा केला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश बामणीकर, सागर सावेकर, उदय साळवी, निवास पाटील, बंडू सुतार, प्रियांका पाटील, जयश्री पाटील, दीपाली तळेकर, उज्ज्वला परीट हजर होते. निवडप्रसंगी गोपाळराव पाटील, शिवाजी तळेकर, रघुनाथ जाधव, शामराव जाधव, आर.आर. पाटील, आनंदा जाधव, रघुनाथ पाटील आदींसह ग्रामपंचायत सेवक प्रकाश पाटील, उत्तम कांबळे, तानाजी चौगले, संतोष राणे व ग्रामस्थ उपस्थित होते.