संप : राज्यात 24 जिल्ह्यात आशा-गटप्रवर्तक यांचा 24 मे रोजी लाक्षणिक संप

कोल्हापूर  :

आशा व गट प्रवर्तकानां शासकीय सेवेत सामावून घ्यावे, किमान वेतन द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापुर जिल्ह्यासह राज्यात 24 जिल्ह्यात  आशा-गटप्रवर्तक यांनी 24 मे रोजी लाक्षणिक संप पुकारला आहे.गट प्रवर्तकांच्या राष्ट्रीय फेडरेशनने 24 मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.राज्यात 24 जिल्ह्यात 32 हजार  महिला सहभागी होणार आहेत.

आशा, गट प्रवर्तक यांना कोरोना काळात, कायम स्वरूपी कर्मचाऱ्याप्रमाणे राबविले जात आहे. परंतू त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही.

याउलट त्यांना काही अधिकारी काढून टाकण्याची धमकी देत आहेत.आणि सर्व्हेक्षणाला गेल्यानंतर  त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होत आहेत.

काही महिलांना  कोरोनामुळे आपले प्राणही गमवावे लागले असून  तरीही त्यांना शासनाकडून योग्य तो मोबदला दिला जात नाही. यासाठी आशा, गट प्रवर्तकांच्या राष्ट्रीय फेडरेशनने 24 मे रोजी  देशव्यापी संपाची हाक दिली आहे. 

कोरोना महामारीत काम करताना कांहीनां प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली असून मुले पोरकी झाली आहेत. तरीही केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

कोरोना महामारीत
12 तास काम करणाऱ्या
आशा व गट प्रवर्तकानां शासकीय सेवेत सामावून घ्यावे, किमान वेतन द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन सहसचिव
नेत्रदीपा पाटील यांनी केली.राज्यातील व  जिल्हयातील सर्व आशा व गट प्रवर्तकानी संपात  सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!