ब्रेकिंग : एसटी बंद आंदोलन : सुमारे पाच हजार प्रवाशांचा प्रवास थांबला
रंकाळा स्टँड येथे वाहक-चालक यांचे काम बंद आंदोलन सुरू, एसटी चे सर्व रूट पडले बंद
पगारवाढीसाठी एसटी वाहक-चालक यांचे काम बंद आंदोलन
कोल्हापूर :
पगार वाढ व्हावी व विविध मागण्यांसाठी ासाठी रंकाळा एसटी स्टँड मधील वाहक-चालक यांनी आज सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे, यामुळे सर्व एसटी गाड्या स्टँडच्या आगार मध्ये थांबून राहिल्या आणि हजारो प्रवासी विद्यार्थी अडकून पडले आहेत.

आली यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले तीन टक्के वेतनवाढ मिळावी, घरभाडे शासन कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे मिळावे, 28 टक्के महागाई भत्ता मिळावा, एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे, नियमित वेतन मिळावे, दिवाळी बोनस पंधरा हजार रुपये प्रमाणे मिळावे, आणि शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वेळेत पगार मिळावा या मागण्यांसाठी आज सकाळपासून एसटी रंकाळा स्टँड येथे एसटी वाहक चालक यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे .त्यामुळे सर्व रस्त्यांचे रूट बंद झाले आहेत, रंकाळा एसटी आगारांमध्ये सर्व एसटी गाड्या थांबून आहेत त्यामुळे अनेक प्रवासी, व विद्यार्थी स्टॅंडवर अडकून पडले आहेत. सकाळपासून साडेदहा पर्यंत अद्याप आंदोलन सुरू आहे.
सर्व एसटी संभाजीनगर आगार मध्ये लावण्यात आले आहेत एकूण 90 गाड्या थांबल्या असून ,57 कंट्रोलर,चालक वाहक, सहभागी, सुमारे पाच हजार प्रवाशांचा प्रवास थांबला आहे.