तरुणाईच्या उत्साहात ऋतुसंकल्प : राजाराम तलाव येथे २ हजार झाडे लावण्याचा आमदार ऋतुराज पाटील यांचा यशस्वी उपक्रम
कोल्हापूर :
आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून आज राजाराम तलाव येथे २ हजार झाडे लावण्याचा उपक्रम युवा पिढीच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. एकाच ठिकाणी, एकाच वेळी ही सर्व झाडे लावण्यात आली. या रेकॉर्ड ब्रेक उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वृक्षप्रेमी नागरिक सहकुटुंब सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित सर्वांना वृक्ष संवर्धनाची शपथ देण्यात आली.
पर्यावरणीय उपक्रमाच्या निमित्ताने समृद्ध कोल्हापूर पर्यावरण समृद्ध करण्याकडे कोल्हापूरकरांनी पुढचे पाऊल टाकले. पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता दाखवत सर्वांनी या माय ट्री माय कोल्हापूर उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. युवक -युवतीनी प्रचंड उत्साहात घेतलेला सहभाग कौतुकास्पद होता. यावेळी 6 ते 10 फूट उंचीची झाडे लावून त्यांना खते घालून चांगला सपोर्टही दिला आहे. या झाडांची कायमस्वरूपी निगा राखण्याची जबाबदारीसुद्धा आमदार पाटील यांनी घेतली.या उपक्रमात सहभागी युवक युवती, कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील प्रमुख मान्यवर, पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.