प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला : ऋतुराज पाटील 

कोल्हापूर – गेल्या पाच वर्षात दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे केलीत. गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी योजना, गाव तिथं  क्रीडांगण, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र या पद्धतीनं  प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण केलाय, अशी माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत दिलीय.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं दक्षिण विधानसभा मतदार संघातून आमदार ऋतुराज पाटील यांना उमेदवारी जाहीर झालीय. या पार्श्वभूमीवर आज आमदार ऋतुराज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली.

पाटील पुढे म्हणाले,  सुरुवातीचे अडीच वर्षे राज्यात  महविकास आघाडीची सत्ता असताना आपण दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणला. गेल्या पाच वर्षात दक्षिण विधानसभा मतदारसंघातील समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केलाय. 14 गावांसाठी  344 कोटी रुपयांची गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी योजना मंजूर केलीय.आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील 14 गावांसाठी गाव तिथं  क्रीडांगण योजना,ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, त्याचबरोबर महापालिकेला  10 वातानुकूलित बसेसाठी आपण निधी उपलब्ध करून दिलाय. याबरोबरच रस्ते, गटर्स अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती  आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

 कोल्हापुरात आय टी पार्क होण्याकरिता  आपण प्रयत्नशील असून त्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचं  आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितलं. शहराच्या हद्दवाढी बद्दल बोलताना आमदार पाटील यांनी शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात राहणाऱ्या लोकांशी समन्वय साधून निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचं स्पष्ट केलं.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!