राज्यात थंडीचा कडाका वाढणार : थंडीची लाट येणार : हवामान विभाग
मुंबई :
राज्यात थंडीचा कडाका आहे. तापमान कमी जास्त होत असून थंडी कायम आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून, थंडीची लाट येणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. देशातल्या तापमानात मोठी घट होणार असल्याचंही हवामान विभागाचं सांगितलं आहे. त्या दृष्टीने नागरिकांना इशारा देण्यात आला आहे.
पुढच्या पाच दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात ३ ते ५ अंशांनी हळूहळू घट होण्याची शक्यता असून, २५ आणि २६ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
ट्विट…
K S Hosalikar
@Hosalikar_KS
24 Jan:
पुढील 5 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात 3-5°C ने हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
25 व 26 जानेवारी 🇮🇳 रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, थंडीची लाट (Cold wave conditions) येण्याची शक्यता आहे.
काळजी घ्या.
-IMD
हवामानातील बदलामुळे राज्यावर धुक्याचे मळभ दाटणार…..
हवामानात बदल होऊन रविवारी राज्याच्या बहुतांश भागावर धूळ आणि धुक्याचं मळभ निर्माण झालं होत. वाढलेल्या आर्द्रतेतून धुकं आणि धूळ वाढवणाऱ्या वेगवान वाऱ्याच्या एकत्रित परउत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ही स्थिती जाणवली, धूलीकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतल्या अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला होता.