अमर पाटील शिंगणापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा प्रतिसाद
करवीर :
जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील यांचे पती,
अमर उर्फ अमृत पाटील शिंगणापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या काळात रक्तदानाचा संकल्प घेऊन नागदेवाडी ता.करवीर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अमर पाटील यांच्या हस्ते शिबिरास प्रारंभ करण्यात आला. यामध्ये ६० रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
यावेळी अमर उर्फ अमृत पाटील म्हणाले, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत रक्तपेढीत रक्तपुरवठा कमी पडून चालणार नाही. यासाठी युवकांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.
या शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते संग्राम ढेरे व रोहित ढेरे यांनी केले. जि.प.सदस्या रसिका पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी अर्जुन ढेरे, शरद निगडे, विजय कामिरे, दिपक ढेरे,माणिक दळवी , निलेश ढेरे , संदीप दिवसे , अभिजित निगडे,रोहित निगडे , प्रथमेश पोवार , अजित ढेरे, मानसिंग निगडे आदींसह नागदेववाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.