राजर्षी शाहू – कुंभी कासारी बचाव पॅनेलचा बीड येथे उद्या ( गुरुवारी ) प्रचाराचा नारळ फुटणार

कोल्हापूर :

कुडित्रे येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजर्षी शाहू – कुंभी कासारी बचाव पॅनेलचा करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे उद्या गुरुवारी (दि. 2) सकाळी ८ वाजता प्रचाराचा नारळ फुटणार आहे. कसबा बीड येथील श्री महादेव मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. या शुभारंभास सर्व सभासद, ऊस उत्पादक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजर्षी शाहू – कुंभी कासारी बचाव पॅनेलच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!