आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेसाठी : सराव शिबिराकरिता कोल्हापूरच्या दोन मुलींची निवड
कोल्हापूर :
पाडळी खुर्द ता. करवीर जिल्हा कोल्हापूर येथील वैष्णवी पाटील व सायली पाटील या दोघींची भारतीय रग्बी संघात शिबिरासाठी निवड झाली.उझबेकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी अठरा वर्षाखालील संघाची निवड होणार आहे.
आशियाई स्पर्धेत भारतीय मुलींचा रग्बी संघ सहभागी होणार आहे, या संघासाठी देशभरातून ५४ महिला खेळाडूंची निवड केली आहे. या स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनच्या खेळाडू वैष्णवी दत्तात्रय पाटील व सायली सतीश पाटील या दोन खेळाडूंची निवड झाली आहे.
वैष्णवी चे वडील शेतकरी असून रिक्षा व्यावसायिक आहेत, आणि सायलीचे वडील शेतकरी आहेत आणि टू व्हीलर मेकॅनिकल म्हणून काम करतात.
या दोन खेळाडूंना असोसिएशनचे अध्यक्ष अमर सासणे, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रशिक्षक दीपक पाटील, अजित पाटील, नासिर हुसेन, संदीप मोसमकर यांचे मार्गदर्शन मिळाले.