रयत संघाचे संचालक सचिन विश्वासराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्यात उत्साहात साजरा
करवीर :
गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील (आबाजी) यांचे चिरंजीव रयत सेवा संघाचे संचालक, शिरोली दुमाला गावचे उपसरपंच युवा नेते सचिन विश्वासराव पाटील(भैया) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील राजकीय, सहकार, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी फोनवरून अभिष्टचिंतन केले.

सचिन पाटील यांना वाढदिवसानिमित्त सकाळी बलभीम विकास संस्था, श्री शाहू छत्रपती दूध संस्था, ना.तु.पाटील विकास संस्था आदी संस्थाच्या वतीने केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या. सकाळपासून शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
वाढदिवसाच्या औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत पाटील परिवाराकडून कोल्हापूर येथे ‘ कोल्हापूर थाळी ‘ उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. यावेळी अन्नदान उपक्रमाबाबत गोरगरिबांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकून सचिन पाटील, सुनील पाटील बंधू भारावून गेले.
गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात कर्मचाऱ्यांवतीने विविध फळे कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी सर्व कर्मचाऱ्यानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी शिरोली दुमाला येथे घरी भागातील युवा कर्याकर्त्याच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. शुभेच्छा देण्यासाठी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील (आबाजी), बाबुराव पाटील (आण्णा), माजी सरपंच नंदकुमार पाटील, वीरशैव बँकेचे माजी चेअरमन अनिल सोलापुरे, माधव पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पाटील, बलभीम विकास संस्थेचे चेअरमन राहुल पाटील, पार्थ पाटील, गोकुळचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, बलभीम विकास संस्थेचे सचिव संजय पाटील, बुद्धीराज पाटील, विलास पाटील, अजित पाटील यांच्यासह भागातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.