जि.प. अध्यक्ष राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर : ५० रक्तदात्यांचा सहभाग
करवीर :
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पी. पाटील (सडोलीकर ) यांच्या वाढदिवसानिमित्त कुडीत्रे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन युवक काँग्रेस माजी अध्यक्ष सरदार पाटील कुडित्रेकर यांनी केले होते.या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात ५० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमास गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक उदय पाटील सडोलीकर, संजय गांधी निराधार कमिटी करवीर अध्यक्ष संदीप पाटील, कुंभी कारखाना माजी चेअरमन संभाजी पाटील, मार्केट कमिटी माजी सभापती पै. संभाजी पाटील, यशवंत बँकचे संचालक आनंदराव पाटील, साबळेवाडीचे शाहू समूह अध्यक्ष रणजित पाटील ,कुडीत्रेचे डे. सरपंच राजाराम कदम, रघुनाथ शेलार, महादेव माळी,धीरज पाटील,कृष्णा धोत्रे, विष्णू पाटील, योगेश कांबळे, सचिन चौगले, विनोद पाटील गोगवेकर,पै सचिन पाटील,विजय पाटील,दादा पाटील,कर्तार पाटील, अभिजित पाटील, गणेश चौगले, अजित भास्कर, समीर किरुळकर,कुडीत्रे ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामसेवक एस.एस.दिंडे आदी उपस्थित होते