श्री यशवंत सहकारी बँकेस राष्ट्रीय पातळीवर बँको पुरस्काराने सन्मानित
अध्यक्ष एकनाथ पाटील
करवीर :
कुडित्रे ता. करवीर येथील श्री यशवंत सहकारी बँकेला राष्ट्रीय पातळीवरील बँको पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगिरी मधून बँको ब्ल्यू रिबन २०२१ सालाकरिता ही निवड झाली आहे.अशी माहिती बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले ग्रामीण कार्य क्षेत्र असणाऱ्या व सर्वसामान्यांची एक कुटुंब एक बँक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आपले श्री यशवंत सहकारी बँकेस, ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगिरी मधून बँको ब्ल्यू रिबन २०२१ या पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार ही बाब अभिमानाची असून याचे सर्व श्रेय बँकेचे सभासद, खातेदार, हितचिंतक, व कर्मचारी यांना जाते.असे अध्यक्ष पाटील म्हणाले.
बँकेने अल्पावधीतच २५० कोटी व्यवसायाकडे गरुड झेप घेतली आहे. रिझर्व बँकेचे सक्षम तेचे सर्व निकष पूर्ण केले असून,बँकिंग क्षेत्रात वाढती स्पर्धा असतानाही ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेने स्वतःचे डाटा सेंटर सह, सर्व ग्राहकांना एटीएम, एनईएफटी, आरटीजीएस ,फास्टॅग, डिजिटल सेवा दिलेल्या आहेत.अल्पावधितच मोबाईल बँकिंग सेवा कार्यान्वित होत असून सर्व ग्राहकांनी आपले व्यवहार बँकेमार्फत करावेत असे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी केले.
बँकेच्या ठेवी १३५ कोटी ६२ लाख, कर्जे ८५ कोटी , भागभांडवल चार कोटी ९४ लाख, एकूण व्यवसाय २०० कोटी २९ लाख झाला आहे. २०१७ मध्ये १२० कोटी चा व्यवसाय होता, नंतर या नवीन संचालक मंडळाने चार वर्षात ८० कोटीचा व्यवसाय वाढवून २०० कोटीचा टप्पा गाठला आहे. सलग दहा वर्षे बँकेचा एनपीए शून्य टक्के आहे. बँकेच्या १० शाखा कार्यरत असून राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीने आधुनिक सुविधा बँकेच्या वतीने पुरवल्या जात आहेत अशी माहिती देण्यात आली .
दरम्यान
प्ररस्कार देताना अविनाश शिंत्रे ,अशोक नाईक कर्नाटक चे खासदार प्रताप सिम्हा, पुरस्कार स्वीकारताना बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील उपाध्यक्ष, हिंदुराव तोडकर,प्रा. टि एल पाटील नामदेव मोळे ,सर्जेराव पाटील, उत्तम पाटील, सुभाष पाटील, प्रकाश पाटील ,दादासाहेब पाटील, एस के पाटील, संग्राम भापकर ,युवराज कांबळे, पांडुरंग पाटील आनंदराव पाटील,संचालक उपस्थित होते.