करवीर :
बोलोली , उपवडे धामणी खोरा जोड रस्ता प्रकल्प व्हावा अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे माजी सरपंच
प्रकाश पाटील यांनी केली. यावेळी खासदार धैर्यशील माने ,माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळ संचालक एस आर पाटील, माजी सरपंच सदाशिव बाटे उपस्थित होते.यावेळी खासदार शिंदे म्हणाले रस्ता सूचीमध्ये या रस्त्याची नोंद करावी यानंतर निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.
करवीर तालुक्यातील बोलोली, उपवडे , तसेच बारावाडया , वस्त्या हा भाग पूर्णपणे दुर्गम आहे. या लोकांच्या दळणवळणासाठी बोलोली , उपवडे धामणी खोरा जोड रस्ता होणे गरजेचे आहे . या लोकांना मुख्य बाजारपेठत येणेसाठी अंदाजे ३० किलोमीटर चे अंतर फिरून यावे लागते . हा जोड रस्ता मुख्य बाजारपेठे पासून अंदाजे ७ ते १० किलोमीटर पर्यंत येऊ शकतो, जोड रस्ता झाल्यास याचा उपयोग बोलोली उपवडे , ता . करवीर व धामणी ता . पन्हाळा तसेच राधानगरी व गगनबावडा या चारी तालुक्यांना होऊ शकतो . पर्यायी लोकांची दळणवळण व्यवस्था व शेतीपूरक व्यवसाय विकसित होण्यासाठी चालना मिळेल .
निवेदनात, पन्हाळा तालुक्यातील पणोरे या गावातील बोलोली , उपवडे या गावातील मुलांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी रोज डोंगररानातून पायपीट करत जावे लागते . जंगली जनावारंचा वावर असल्यामुळे धोकादायक पायवाटेतून मुले ये – जा करत असतात . या मुलांची व या परिसरातील लोकांची सोय होणेकारिता भरीव व योग्य ती मदत मिळावी . तसेच प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान महादेव मंदिर आमशी ( सातेरी ) आणि स्वयभूमंदिर बोलोली ता . करवीर या तालुक्यात वसले असून पन्हाळा तालुक्यातील लोकांना डोंगर पायथ्याशी सलंगन होऊन तब्बल अंदाजे २५ किलोमीटर देव दर्शनासाठी यावे लागते . ही गैरसोय टाळण्यासाठी डोंगर माथ्यावरून रस्ता झाल्यास हेच अंतर अंदाजे १० किलोमीटर होऊ शकते .
या रस्त्याची मागणी स्वतंत्रपूर्व काळापासून होत आलेली आहे. तरी सर्व चार तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील , जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य सदस्य , साखर कारखाना संचालक सर्व पंचक्रोशीत नागरिकांची रस्ता पूर्ण व्हावा ही प्रचंड व प्रभळ इच्छाशक्ती व्यक्त केली आहे . लोकांच्या मागणीचा आदर करून रस्त्यास लवकरात लवकर शासकीय निधी मिळवून द्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली.