रस्त्याला पडल्या प्रचंड मोठया भेगा : या गावांचा संपर्क तुटला
गगनबावडा :

अतिवृष्टी, आणि संततधार पावसामुळे रस्त्याला प्रचंड मोठया भेगा पडल्या आणि या गावांचा संपर्क तुटला आहे.अणदूर -धुंदवडे ता .गगनबावडा येथील गावाकडे जाणारा मुख्य रस्ता ( bhuskhalan ) पूर्ण पणे खचला आहे.यामुळे अणदूर -धुंदवडे गावचा संपर्क तुटला आहे.घटनास्थळी माजी सरपंच तानाजी पाटील, पोलीस पाटील आंनदा गुरव, यांनी भेट दिली व घटनेची माहिती दिली .
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर अणदूर ते धुंदवडे ता .गगनबावडा येथील गावाकडे जाणारा रस्ता ,जोरदार पाऊस पडल्याने डोंगरात दरीच्या ठिकाणी दत्त मंदिर जवळ, रस्ता पूर्ण पणे खचला आहे.यामुळे अणदूर -धुंदवडे गावचा संपर्क तुटला आहे .सुमारे 50 फूट लांबीचा रस्ता खचला आहे,13 फूट खोल रस्ता खाली दरीच्या दिशेला सरकला आहे.
यामुळे अणदूर ते धुंदवडे गावचा संपर्क तुटला असून या नागरिकांना ये जा करण्यासाठी आता सांगशी फाटा जरगी म्हासुरली असे सुमारे 50 किलो मीटर अंतर फिरून यावे लागणार आहे.
दरम्यान रस्ता खचलेल्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.