रासायनिक खतात पुन्हा दरवाढ

पोटॅश खताचे दर ७४० रुपयेने वाढले

ऊस खोडवा पिकाची कामे अडचणीत

१०:२६:२६ खताची चार महिने टंचाई

कोल्हापूर :

रब्बी नंतर उन्हाळी हंगामाच्या तोंडावर  पुन्हा एकदा रासायनिक खतांची मोठी दरवाढ  झाली आहे, पोटॅश बॅग चा दर ७४० रुपयेने वाढला  आहे,वाढीव दराचे खतही बाजारात आले आहे.१०:२६:२६ खताची चार महिने टंचाई असून  अवकाळी पावसामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. दर वाढल्याने लाखो रुपयांचा फटका  शेतकऱ्यांना बसणार आहे. खतांची सरासरी ५० ते २०० आणि ७४० दरवाढ झाली, आणि खते शॉर्टेज असल्यामुळे ऊस खोडवा पिकाची कामे अडचणीत आली आहेत, खताची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे २२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र होते, यानंतर उन्हाळी हंगामाचे सुमारे तीन हजार ५०० हेक्‍टर क्षेत्र आहे , उन्हाळी हंगामात सूर्यफूल बियाण्याची मागणी असताना जिल्ह्यात एक किलो ही सुर्यफुल उपलब्ध नाही, यामुळे शेतकऱ्यांनी भुईमुंग आणि इतर पिके घेण्यावर भर दिला आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील पिकांच्या कामासाठी सुमारे ४० हजार टन खताची मागणी असते मात्र बहुतांश खताची टंचाई असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

जिल्ह्यात सर्वत्र ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे यानंतर खोडवा पिकाची भरणी आणि लागवडीचे खते टाकण्याची कामे असताना जिल्ह्यात डीएपी आणि एमओपी खताचा तुटवडा आहे. यंदा पुराने नदीकाठची पिके गेली आहेत, गेल्या महिन्यातील अवकाळी पावसाने  रब्बी हंगाम अडचणीत आला असताना पुन्हा खत दरवाढीची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या वर आहे. १०:२६:२६ खताचा तुटवडा चार महिने जाणवत आहे, हंगामी लागणीला,खोडवा पिकाला १०:२६:२६ खताची मागणी होत आहे.

काही कंपन्या चे दर १०:२६:२६ खताचे दर मागील दर ११८० वरून वाढून १३६५ रुपये होता ,तो आता पुन्हा दर १६७५ झाला आहे, आता हा दर ३१० रुपयेने वाढला आहे, पोटॅश १०४० रुपयेचा दर १७८० रुपये झाला आहे.पोटॅश मध्ये ७४० रुपये वाढ झाली असल्याची माहिती कृषी  सूत्रांनी दिली आहे. केंद्र शासनाने वाढीव सबसिडी नाही दिली तर वाढ होईल, कंपन्या शासनाच्या निर्णयाची वाट बघत आहेत ,अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.


खताचे मागील दर व   दर वाढ अशी,
प्रति ५० किलो वाढलेले दर ,खताचा प्रकार…

१०:२६:२६ { दर १४४० ते १४७० -१७० रुपये वाढ,)

१२:३२:१६ : (दर १४४० ते १४९०= १५० वाढ)

१६ :२० : ० : १३ : (१०७५ ते १२५०= ५० वाढ)

अमोनिअम सल्फेट, दर ८७५ : (१२५ वाढ)

१५ : १५ : १५ : ० ९ : दर ११८० ते १४५० 🙁 १९५ वाढ)

दुय्यम,शुष्म अन्न  खत १०० रुपये दरवाढ ,

काही कंपन्यांच्या खत दरवाढीमध्ये तफावत आहे.

============
ज्ञानदेव वाकुरे ,जिल्हा कृषी अधीक्षक, दोन कंपन्यांच्या खतांमध्ये दरवाढ झाली ,ऊस तोडणीनंतर खताची मागणी आहे ,डीएपी एमओपी उपलब्ध नाही, देशात डीएपी चा तुटवडा आहे.



Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!