विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक वापर केल्यामुळे डोळ्यांचे दोष
रोटरी प्रेसिडेंट विजय चौगुले
रोटरी क्लब तर्फे मोफत चष्मे वाटप
करवीर :
कोविड काळात गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक वापर केल्यामुळे डोळ्यांचे दोष निर्माण झाले आहेत. यासाठी
शालेय विदयार्थ्यांना वाढत्या नेत्र दोषावर उपाय योजना करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ शिरोली एम आय डी सी,व सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोगे ता. करवीर येथे मोफत नेत्र तपासणी व या चष्मे वाटप करण्यात आले. अशी माहिती रोटरीचे प्रेसिडेंट विजय चौगुले यांनी दिली.
यावेळी चौगले म्हणाले,योग्य वेळी योग्य उपचाराने नेत्र रोग दूर होऊ शकतात या साठी कणेरी मठ व रोटरी क्लब ऑफ शिरोली यांच्या संयुक्त विधमाने हा उपक्रम पार पडला.
लिट्रासी प्रोग्रायम अंतर्गत दृष्टी अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये कोगे येतील कन्या व कुमार विदयालय, तसेच सांगरूळ शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कोगे येथे ७०० विदयार्थ्यांचे नेत्र तपासणी केली, यामध्ये विद्यार्थी दोशी आढळून आले, व श्री विद्या मंदिर कोल्हापूर येते ४५५ विध्यर्थनची तपासणी केली असता ३९ विध्यार्थी डोळ्या कडून दोषी आढळून आले. या सर्व विदयार्थना रोटरी क्लब ऑफ शिरोली तर्फे मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी ग्राम समाज सेवा केंद्र अध्यक्ष तानाजी मोरे यांच्या यांनी गेली सतरा वर्षे रोटरीच्या माध्यमातून समाजकार्य सुरू असल्याचे सांगितले.
स्वागत कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता यादव,आभार कुमार विद्यामंदिर चे मुख्याध्यापक नाना सुतार यांनी मानले.
क्लबचे प्रेसिडेंट विजय चौगुले, क्लबचे – सेक्रेटरी -मिलिंद जगदाळे, व क्लबचे डायरेक्टर – सुनील जाधव, बाजीराव साठे, रोहित घराळ, अर्जुन हरुगले,आतुल नाईक, अध्यापक अध्यापिका पालक उपस्थित होते.