रस्ता खचला :
तुटलेला रस्ता अपघाताला निमंत्रtaRa
करवीर :
अतिवृष्टी व कुंभी नदीला आलेल्या महापुरामुळे सांगरुळचा मुख्य रस्ता खचला असून अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे .एखादा मोठा अपघात होण्याआधी तातडीने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे.
धोकादायक रस्ता म्हणून खचलेल्या ठिकाणी कापडी चिंध्या बांधण्यात आल्या आहेत .
कुंभी नदी वरील पुलाच्या पश्चिमेकडील बाजूच्या वळनावरील रस्त्याची साईड पट्टी तुटली असून रस्त्याच्या साईड पट्टी पासून भराव खचला आहे, व तुटलेला भाग नदीच्या दिशेने सरकला आहे.तुटलेला रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे .
याठिकाणी पुराच्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असतो तातडीने उपाययोजना न केल्यास पुरामुळे रस्ता तुटून जाण्याची शक्यता आहे.
सांगरुळ कुडित्रे मुख्य रस्त्यावरील कुंभी नदीवरील पुलाच्या पश्चिमेकडील बाजुच्या मोठ्या वळना जवळ रस्ता व बाजूच्या शेतीमध्ये पंधरा ते वीस फूट भराव आहे. रस्ताही अरुंद असून साईट पट्टी आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने 20 ते 25 फुटापर्यंत ची साईट पट्टी पूर्णपणे खचली आहे.तर या ठिकाणी असणारी दोन मोठी झाडेही ही घसरली आहेत. तर तुटलेल्या ठिकाणापासून 40 ते 50 फूट लांब मोठी भेग पडली असून याठिकाणीही साईड पट्टी तुटण्याची शक्यता आहे. या रस्त्यापासून नदीचे अंतर खूपच कमी आहे. नदीला पुर आल्यानंतर पाण्याचा प्रवाह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. तातडीने उपाययोजना न केल्यास पुरात हा रस्ता तुटण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या . ठिकाणी तातडीने मुरूम टाकून दगडी पिचिंग करणे गरजेचे आहे.
दरम्यान सांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच सुशांत नाळे, कर्मचारी सागर नाळे, सुनिल पाटील,सागर खडके यांनी तातडीने रस्त्यावर पडलेली झाडे कट करून वाहतूक सुरळीत केली आहे .