राजीवजी गांधी यांची ७७ वी जयंती उत्साहात
कोल्हापूर :
आमदार पी.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २८ वर्षे अखंडीतपणे राजीवजी गांधी जयंती साजरी केली जात आहे. आज राजीवजी गांधी यांची ७७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कोल्हापूर येथे श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील साहेब, संयोजक आमदार पी.एन पाटील (सडोलीकर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी श्रीपतरावदादा बॅंकेचे चेअरमन राजेश पाटील, आमदार जयवंत आसगावकर, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती रसिका अमर पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील , श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोन्द्रे, यांच्यासह राजीवजी सुतगीरणी, भोगावती कारखाना, निवृत्ती संघाचे सर्व संचालक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.