स्वर्गीय कै. आनंदराव पाटील- चुयेकर यांनी ‘गोकुळ’ चा लौकिक राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला…….

-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

गोकुळःता.१६: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) चे संस्‍थापक व शिल्‍पकार स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचा ८ वा स्‍मृतीदिन कार्यक्रम गोकुळ प्रकल्‍प येथे राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री मा.नाम.हसन मुश्रीफसो व संघाचे चेअरमन मा. विश्वास पाटील व सर्व संचालक यांच्‍या उपस्थित पार पडला.या कार्यक्रमावेळी के.डी.सी.सी बँकेच्या संचालक पदी निवड झाले बद्दल मा.नाम.हसन मुश्रीफ व प्रताप उर्फ भैया माने यांचा सत्कार गोकुळ परिवारातर्फे करण्यात आला.

यावेळी प्रास्‍ताविकामध्‍ये बोलताना संघाचे चेअरमन मा. विश्वास पाटील म्‍हणाले की, गोकुळ दूध संघाच्‍या जडणघडणीमध्ये स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गावोगावी धवल क्रांती निर्माण करून ग्रामीण जीवन समृद्ध बनविले आणि हि सर्व किमया स्‍वर्गीय चुयेकर साहेबांनी सहकाराच्या माध्यमातून घडवली आहे असे गौरोद्गार काढले.

यावेळी बोलताना राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री मा.नाम.हसन मुश्रीफसो म्‍हणाले की स्वर्गीय आनंदराव पाटील – चुयेकर यांनी गोकुळ सहकारी दूध संघ स्थापन केला. गोकुळचा लौकिक त्यांनी राष्ट्रीय पातळीवर पोहोचविला. गोकुळ दूध संघाचा विस्तार करायचा असेल तर दूध संकलन वाढीबरोबरच दुधाचे व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण महत्त्वाचे आहे हे श्री. चुयेकर यांनी जाणले होते. दर्जेदार व सकस दूध गोळा करण्यासाठी त्यांनी थेट फॅट व एसएनएफ नुसार दुधास दर देवून संकलन करणे व दूध उत्पादकांच्या सेवेसाठी पशुसंवर्धन सेवा गावोगावी पोहोचविल्या. सहकारी चळवळीचे तत्व त्यांनी मनापासून जपले. दूध उत्पादक,शेतकरी हेच खरे संघाचे मालक असून ते फक्त विश्वस्तांच्या भावनेतूनच ते कायम कार्यकरत राहिले. त्यांच्या योगदानातून गोकुळ दूध संघाचे हे एवढे मोठे वैभव उभा राहिले आहे. गोकुळ दूध संघ अमूल च्या दर्जाचा करू हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असे श्री मुश्रीफ म्हणाले वीस लाखाचा टप्पा दृष्टीक्षेपात आलेला आहे त्यामध्ये म्हैशीचे दूध संकलन वाढ करणे व आपली दूध विक्री व्यवस्था हि तेवढीच मजबूत करणे गरजेचे असून. मुंबई ,पुणे मध्ये विशेषतः म्हैशीचे दूधाला जास्त मागणी आहे त्या ठिकाणी गाय दूध विक्री वाढवण्याच्या दृष्टीने संघाच्या दूध वितरकांना दूध विक्रीचे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जुन्या आठवणी सांगतांना ते म्हणाले कि आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी असा कायदा होता कि दूध हे जिल्ह्यातच संकलन करायचे व वितरण हि जिल्ह्यातच करायचे त्यावेळी पवार साहेबांनी खासबाब म्हणून मुंबई मध्ये गोकुळला दूध विक्री करण्याची परवानगी त्यावेळी चुयेकर साहेबांना दिली.मी व सतेज उर्फ बंटी पाटील ,इतर सहकारी कोणत्याही प्रकाराचा स्वार्थ न ठेवता दूध उत्पादक शेतकरी,ग्राहक, प्राथमिक दूध संस्था,संघाचे कर्मचारी यांच्या हिताचाच कारभार राहील अशी प्रतिज्ञा त्यांनी केली.

याप्रसंगी स्‍वागत व प्रास्ताविक संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी केले व आभार माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे यांनी मानले, सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले.

      याप्रसंगी जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित  तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, के.डी.सी.सी. बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, बाळासाहेब जगताप (अहमदनगर), कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी  एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

      

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!