सावधान : राधानगरी धरणाचा आज मुख्य दरवाजा उघडून अडकला ,यामुळे नदी पात्रात सुमारे 4 हजार क्युसेक विसर्ग सुरू : नदी काठावर दक्षता बाळगावी
राधानगरी :
राधानगरी धरणाचा आज मुख्य दरवाजा उघडून अडकला आहे,यामुळे नदी पात्रात सुमारे 4 हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे.
तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा कामाला लागली आहे.

राधानगरी धरणाच्या दरवाजाचे तांत्रिक काम सुरू आहे,काम करत असताना आज सकाळी 8 वाजता मुख्य दरवाजा उघडून अडकला. त्यामुळे नदी पात्रात अंदाजे 4 हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा कामाला लागली आहे. दुरुस्तीसाठी पथके रवाना झाली आहेत.
नदी पात्रातील पाणी वाढणार असून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठावरील गावांतील नागरिकांनी नदीवर जनावरे, कपडे धुण्यासाठी जाऊ नये.
नदीमधील पाण्याची पातळी वाढणार असून पाणी उपसा करणाऱ्या मोटरी बुडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीकाठावर जाऊ नये, आणि काळजी घ्यावी.