या गावात, रास्तभाव धान्य दुकानासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

  • प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर :

जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी एकूण 22 नवीन रास्तभाव धान्य दुकानांसाठी सन 2023 चा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. इच्छुक संस्थांनी, महिला बचतगटांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी विहीत मुदतीत सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे.

रास्तभाव दुकान व गावाची/क्षेत्राची नावे पुढीलप्रमाणे-
करवीर तालुका- केर्ले, घानवडे, तामगाव, गोकुळ शिरगाव कोगे, व परीते. भुदरगड तालुका- तांब्याचीवाडी. हातकणंगले तालुका- पट्टणकोडोली (अलाटवाडी क्षेत्राकरिता), हातकणंगले, रेंदाळ व रांगोळी. गडहिंग्लज तालुका- नौकुड, मुतनाळ, हेब्बाळ कसबा नूल, भडगाव, हेळेवाडी व बेळगुंदी. चंदगड तालुका- आमरोळी व जंगमहट्टी. आजरा तालुका- जाधेवाडी व भावेवाडी व कागल तालुक्यातील यमगे याप्रमाणे आहे.

नवीन रास्तभाव धान्य दुकानाकरिता अर्ज करण्याकरिता वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
नवीन रास्तभाव दुकान परवाने मंजूर करण्याकरिता जाहीरनामा काढणे व प्रसिध्द करणे- दि. 13 जानेवारी 2023
संस्थांना अर्ज करण्यास मुदत- 13 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2023
प्राप्त अर्जांची प्राथमिक तपासणी, छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पूर्ण करणे- दि. 13 फेब्रुवारी ते 12 मार्च 2023 व
नवीन दुकाने मंजुर करणे- दि. 13 मार्च ते 12 एप्रिल 2023 याप्रमाणे राहील.

अर्ज करण्यासाठीच्या पात्रतेचे निकष ,अटी व शर्ती संबंधित तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती, गाव चावडी व संबंधित ग्रामपंचायत येथे प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. अर्जदार संस्थांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संबंधित तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!