रत्नागिरी आणि रायगडला हवामान विभागाचा रेड अलर्ट : चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक

मुंबई :

राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. रत्नागिरी आणि रायगडला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. चिपळूणमध्ये गेली १७ तास मुसळधार पाऊस कोसळत असून पुन्हा एकदा महापुराची भीती असल्याने आधीच एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे.

K S Hosalikar
@Hosalikar_KS
Latest satellite obs at 1800hrs: Very dense clouds observed ovr Konkan & Madhya Mah, Marathwada too.Severe weather warnings r there with 🔴 red alert for Ratnagiri & Raigad today by IMD
Mumbai Thane Palghar could also see enhanced rainfall today, though it didn’t rained till now

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा थेट आणि संपूर्ण परिणाम हा महाराष्ट्रावर होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चिपळूणमध्ये NDRF टीम दाखल झाली आहे,
रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर एनडीआरएफचे पथक आज चिपळूणमध्ये दाखल झाले. २५ जवानांसह आवश्यक ती यंत्रणा घेऊन हे पथक पुणेमार्गे चिपळूणमध्ये दाखल झाले आहे. चिपळूणमध्ये पुन्हा महापूर आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी या पथकाची मोठी मदत होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. चिपळूणमध्ये गेली १७ तास मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहराच्या सखल भागात पाणी भरत असून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाण्याचा निचरा होत आहे.

प्रशासनाने 22 जुलैच्या महापुराचा धडा घेत पूर परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन केले आहे. शहरात विभागवार नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी भरण्यास सुरवात झाल्यानंतर भोंगा वाजवून सतर्कतेचा इशाराही दिला जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!