रा.बा.पाटील विद्यालयास ‘ सावित्रीच्या लेकी ‘ या सामाजिक संस्थेच्या वतीने संगणक संच भेट
करवीर :
सामाजिक कार्यात अग्रेसर
असलेल्या सावित्रीच्या लेकी या सामाजिक संस्थेच्या वतीने सडोली खालसा ता. करवीर येथील
रयत शिक्षण संस्थेच्या रा.बा.पाटील विद्यालयास विद्यार्थ्याना बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेता यावे याकरिता दोन संगणक संच भेट देण्यात आले. सोशल डिस्टन्सचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला .
यावेळी सावित्रीच्या लेकी या सामाजिक संस्थेच्या प्रमुख शैलजा कुरणे म्हणाल्या, सडोली
खालसा येथील ही संस्था ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांसाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी ही संस्था असल्याचे सांगून संस्थेमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम , प्रबोधनपर कार्यक्रम यांची माहिती दिली.
विद्यालयाचे कलाशिक्षक आर.व्ही.शिंदे यांनी सावित्रीच्या लेकी संस्थेच्या उपक्रमाबद्धल बोलताना शैलेजा कुरणे यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून केलेले कार्य स्त्रियांच्या कर्तृत्वाला प्रेरणा देणारे आहे असे गौरवोद्गार काढून अभिनंदन केले .
कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक आर .बी . नेर्लेकर , पर्यवेक्षक व्ही.बी. साठे , एस.डी .पाटील , आनंदा मोरे , जीवन पाटील , संभाजी बामणेकर , सयाजी चौगले , आर.एस. कांबळे उपस्थित होते.