साधा संधी रेल्वेत भरती : जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात आहे रिक्त जागा
Tim Global :
सरकारी नोकरी करिता तरुणांसाठी आता रेल्वेत भरती होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वेत रिक्रूटमेंट सेल (RRC) मध्य रेल्वेने २४०० पेक्षा जास्त ट्रेड अप्रेंटिसच्या भरतीसाठी अर्ज जारी करण्यात आले आहेत.
पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२२ आहे.
अर्ज करणार्या उमेदवाराचे संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र धारक असावा. तसेच ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा १५ ते २४ वर्षे आहे. आरक्षित वर्गाला नियमानुसार सूट देण्यात येतील.उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आणि काही अडचण आल्यास ते सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत ०२२-६७४५३१४० या क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवू शकतात. रविवार आणि इतर सुटीच्या दिवशी हा क्रमांक उपलब्ध होणार नाही. याशिवाय उमेदवार माहितीसाठी act.apprentice@rrccr.com वर मेल करू शकतात.
अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएसला १०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर हा अर्ज आरक्षित वर्गासाठी विनामूल्य आहे. एकूण रिक्त पदांची संख्या २४२२ आहे.
या भरतीमध्ये………
मुंबईत १६५९ पदे, भुसावळमध्ये ४१८ पदे, पुण्यात १५२ पदे, नागपूरमध्ये ११४ पदे आणि सोलापूरमध्ये ७९ पदे भरण्यात येणार आहेत.