रयत सेवा संघाच्या बैलजोडी छाप हातमिश्रखताचा शुभारंभ
करवीर :
पाडळी खुर्द येथील
रयत सेवा संघाच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर १८:१८:१०बैलजोडी छाप हात मिश्रखत उत्पादनाचा शुभारंभ रयत संघाचे मार्गदर्शक संचालक व गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील (आबाजी )यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिरोली दुमाला ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदी निवड झालेबद्दल रयत संघाचे चेअरमन सचिन पाटील यांचा रयत संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
स्वागत प्रास्ताविक व्यवस्थापक तानाजी निगडे यांनी केले. यावेळी नेमगोंडा पाटील, सुभाष चौगुले,चिंतामण गुरव, कुंडलिक पाटील,विलास पाटील,दिगंबर बाटे, मारुती मोरे,माधुरी जाधव, निर्मला निगडे, विश्वास पाटील आमशीकर यासह कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. संघाचे व्हा. चेअरमन शिवाजी देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.