महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे राहुल पी. पाटील यांच्या प्रचारार्थ सडोली खालसा गावी उत्साहात रॅली
कोल्हापूर :
करवीर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसचे राहुल पी. एन.पाटील सडोलीकर (भैय्या) यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्यांच्या सडोली खालसा गावी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि करवीर मतदार संघातील जनतेचा उत्स्फूर्त सहभाग होता. गावी राहुल पाटील व सौ. तेजस्विनी राहुल पाटील यांचे महिलांना औक्षण केले. त्या नंतर त्यांनी गावातील देवाचे दर्शन व गावातील ज्येष्टांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी राहुल पी. पाटील म्हणाले, सध्याच्या काळात असलेली महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढत चाललेली बेरोजगारी अशा अनेक समस्या सर्वसामान्य जनतेला सतावत आहेत.येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता आल्या नंतर सामान्य नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा विश्वास दिला.
रॅलीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे क्रांतिसिंह पवार,बाबासाहेब देवकर, के.बी.पाटील,भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील, सडोली खालसाचे सरपंच अमित पाटील अॅड.शाहू काटकर,माजी जिल्हा परिषद सदस्य भरत मोरे,भोगावतीचे आजी-माजी संचालक, पं सं व जिल्हा परिषदचे आजी माजी पदाधिकारी, काँग्रेसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.