भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ सण : भाऊ-बहिणीचा स्नेह
Tim Global :
भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे.श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे.
उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, तर पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनासंदर्भात आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळून येतो.
हिंदू पंचांगानुसार, रक्षाबंधन पौर्णिमा ही २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता सुरू झाली असून २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.३१ वाजता संपणार आहे. मात्र राखी बांधण्याची शुभ वेळ २२ ऑगस्ट रोजी सकाळी ६.१५ वाजता सुरू होईल. आणि त्याच संध्याकाळी ५.३१ पर्यंत तुम्ही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करू शकतात.
रक्षाबंधनाचे महत्व… भावाबहिणीचे नाते हे भांडणाचे, खोडीचे तरीही तितक्याच प्रेमाचे असल्याने हा केवळ धागा नसून त्या धाग्याला नात्याचे महत्त्व आहे. या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. असा हा रक्षाबंधनाचा दिवस जगभरात साजरा होतो.
पौराणिक कथा व इतिहास पाहता रक्षाबंधन या सणात काळानुरूप बदल झालेला आढळतो. आता तर रक्षाबंधन भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे प्रतिक म्हणून देशात साजरे होताना दिसते. त्यात बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधत असते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारत असतो.