आमदार पी.एन.पाटील यांच्या उपस्थितीत : केंद्र सरकारच्या महागाई विरोधात उद्या शनिवारी बीडशेड ते कसबा बीड पदयात्रा
करवीर :
आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या महागाई विरोधात उद्या शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता बीडशेड ते कसबा बीड पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने मोदी सरकारच्या वाढत्या महागाईच्या विरोधात सर्वसामान्यांसाठी आवाज उठवला जाणार आहे. या अनुषंगाने आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीडशेड ते कसबा बीड पदयात्रा काढून
केंद्र सरकारच्या वाढत्या महागाईला विरोध केला जाणार आहे.
या पदयात्रेत मी स्वतः उपस्थित राहणार असून आपण सर्वांनीही सामील व्हावे, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.