कसबा आरळे माध्य. विद्यालयाचे सुधीर आमणगी यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
करवीर :
राज्य शासनाचे क्रांतीज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षक पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यामध्ये करवीर तालुक्यातील कसबा आरळे येथील माध्यमिक विद्यालय कसबा आरळेचे शिक्षक सुधीर आप्पया आमणगी यांच्या नावाचा समावेश आहे. राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेबद्दल श्री. आमणगी यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

सुधीर आमणगी सर यांच्या कार्याची ओळख :
विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीवर करण्यात यश :
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली आयोजित इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. आधुनिक बैलगाडी हे उपकरण बनविलेल्या सुरेश पवार या विद्यार्थ्याला राष्ट्रीय पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार. सुरेश पवार या विद्यार्थ्याला जपान अभ्यास दौऱ्यास संधी
इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात फळ काढणी हे यंत्र बनविलेल्या ज्ञानेश्वर पाटील याला राष्ट्रीय पातळीवर सहभागाची संधी. तसेच अन्य दोन विद्यार्थी मनीष पाटील आणि प्रज्ज्वल उत्तम देसाई या दोन विद्यार्थ्यांना राज्य पातळीवर सहभागाची संधी.
शासन स्तरावरील विविध स्पर्धामधील यश :
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आयोजित नवोपक्रम स्पर्धेत विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासासाठी राबविलेल्या नवोपक्रमास राज्य पातळीवर दुसरा क्रमांक तसेच विविध आपत्ती संदर्भात विद्यार्थ्यांच्यामध्ये तसेच समाजात जनजागृतीसाठी राबविलेल्या नवोपक्रमाची राज्य पातळीवर सहभागासाठी निवड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत ज्ञानरचनावादी अध्ययन आणि अध्यापन , कृतिपत्रिकाद्वारे अध्ययन अनुभवांची निर्मिती व मूल्यमापन आणि ऑनलाईन अध्ययन अध्यापन या विषयासाठी लिहिलेल्या निबंधाना राज्य पातळीवरील पुरस्कार
राष्ट्रीय पातळीवर शोधनिबंध सादरीकरण :
International Research journal of India : या नियतकालिकेमध्ये कृतिपत्रीकाद्वारे मूल्यमापनासाठी विविध अध्ययन अनुभवांची निर्मिती करणे. हा शोध निबंध प्रसिद्ध
मराठी विज्ञान परिषद मुंबई आणि आयसर पुणे येथे विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत विचार करण्याची क्षमता या विषयावर शोध निबंध सादरीकरण
बालभारती या संस्थेत पाठ्यपुस्तक निर्मितीमधील योगदान :
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे (बालभारती )या संस्थेत जलसुरक्षा पाठ्यपुस्तक इयत्ता नववी, दहावीसाठी तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये विषय समिती सदस्य, राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे येथील विज्ञान विभागातील विविध उपक्रमात योगदान :
राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे येथील विविध उपक्रमात सहभाग जसे की, पायाभूत प्रश्नपत्रिका निर्मिती, विज्ञान कीट मार्गदर्शन, विज्ञान प्रश्न पेढी निर्मिती, स्वाध्याय निर्मिती, सेतू अभ्यास निर्मितीमध्ये सहभाग राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे व बालभारती यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शाळामधील शिक्षकांना पूरक शिक्षक हस्तपुस्तिका निर्मितीमध्ये इयत्ता पाचवीसाठी अध्ययन साहित्य निर्मितीमध्ये सहभाग
बालभारतीमध्ये तसेच राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे येथे इयत्ता दहावीसाठी ऑनलाईन तासिका मार्गदर्शन
विज्ञान कीट वापराबाबत मार्गदर्शनपर व्हिडिओ निर्मिती मध्ये सहभाग
विज्ञान विषयामधील व्हिडिओ निर्मिती :
डिजिटल स्कूल अंतर्गत power point च्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन
शासनाच्या दिक्षा अॅपसाठी इयत्ता सातवी, आठवी आणि नववी या वर्गांसाठी व्हिडिओ निर्मिती
स्वत:चे Sudhir Amangi नावाचे You Tube चॅनेल. सुमारे 276 क्षणिक व्हिडिओंची निर्मिती.
इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील प्रात्यक्षिकांची व्हिडिओ निर्मिती : राज्यभरातील विद्यार्थी शिक्षक यांना उपयुक्त
पुस्तक लिखाण
विज्ञानाचा जागर , पर्यावरण आणि आपण ,
पर्यावरणीय स्वच्छता आणि प्रदूषण याबाबत समाजात आकाशवाणी वरून समाज प्रबोधन :
आकाशवाणी कोल्हापूर वरूनसकाळी ६.५० वाजता प्रसारित होणाऱ्या परिसर कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण विषयी जनजागृती
आकाशवाणी कोल्हापूर वरून शालेय विद्यार्थ्यांच्या बालजगत या कार्यक्रमाची निर्मिती व सादरीकरण
करवीर तालुका विज्ञान शिक्षक अभ्यास मंडळाची स्थापन त्याद्वारे शिक्षकांच्या अध्ययन अध्यापन समस्या सोडविण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन अभ्यास सहलींचे आयोजन -विविध संशोधन संस्थाना भेटी जसे की भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र मुंबई , तारापूर अणुउर्जा केंद्र , बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी , हाफकिन institute, प्रादेशिक हवामान केंद्र पुणे .