के.वाय.सरनाईक सर ‘ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा ‘ ने सन्मानित
कोल्हापूर : विद्या मंदिर हिरवडे दुमाला (ता. करवीर) शाळेचे मुख्याध्यापक के.वाय.सरनाईक सर (रा. शिरोली दुमाला ) यांना आनंद गंगा फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने दिलेल्या जाणाऱ्या ‘ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा ‘ ने सन्मानित करण्यात आले. अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथील दिमाखदार कार्यकमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
के. वाय.सरनाईक हे उत्कृष्ठ चित्रकार , हार्मोनियम वादक , तंत्रस्नेही , ऑनलाईन कामात तज्ञ, सुत्रसंचालक व व्याख्याता , शिष्यवृत्ती मार्गदर्शक , सांस्कृतिक कार्यक्रमात दिग्दर्शक , शैक्षणिक उपक्रम राबविण्यात पुढाकार , सामाजिक कार्यात पुढाकार आदी गुणवैशिष्ट्यानी संप्पन्न असे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन संस्थेना त्यांचा यथोचित बहूमान केला आहे.
पुरस्कार सोहळ्यास संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे प्राचार्य विराट गिरी, जयश्री गिताजे, साधना पाटील, रवींद्र माने, अमरसिंह पाटील तानाजी पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.सरनाईक यांना पुरस्कार प्रदान झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.