जि.प.अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते पाटेकरवाडी येथे विविध विकासकामांचा प्रारंभ ; महिला श्रम रोजगार मेळाव्याचे आयोजन
करवीर :
पाटेकरवाडी (ता.करवीर) येथे आमदार पी.एन पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून मंजूर रस्ते कामाचा, पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून घाट कामाचा शुभारंभ जि.प.अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती व राजीवजी सुतगीरणीचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील हे होते.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी निवड झालेबद्दल राहुल पाटील सडोलीकर, गोकुळ संचालक पदी निवड झालेबद्दल बाळासाहेब खाडे व जिल्हा परिषदेचा राजर्षी शाहू पुरस्कार मिळालेबद्दल सदस्या शिल्पा चेतन पाटील यांचा विशेष सत्कार संपन्न झाला. त्यानंतर दिवसभर महिला श्रम रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने महिलांना विविध श्रम कौशल्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जि.प.अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर , गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे , ज्येष्ठ नेते व माजी उपसभापती मारुती पाटील माजी सरपंच विष्णू पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला माजी उपसभापती विजय भोसले, पं.स.सदस्या सविता पाटील, अर्चना खाडे, राजाराम पाटील, अरुण खाडे, भोगावती कारखाना संचालक डवरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी ग्रा.पं.सदस्य निवृत्ती पाटील व प्रास्ताविक ज्ञानेश्वर विकास संस्थेचे सचिव बाजीराव पाटील यांनी केले. यावेळी माजी सरपंच विष्णू नागोजी पाटील, सरपंच सुनीता पाटील, उपसरपंच सचिन पाटील, सारंग पाटील, भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. अशोक पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.