कोल्हापूर :
गोकुळ निवडणुकीसाठी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी पॅनेल जाहीर झाले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे जिल्हा ढवळून निघाला आहे. आज दोन्ही पॅनेल प्रमुखांनी आपापल्या पॅनेलची घोषणा करून उमेदवारांची नावे जाहीर केली.
यामध्ये सर्वसाधारण गट :
चेअरमन रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, बाळासाहेब खाडे, उदय निवासराव पाटील, सत्यजित सुरेश पाटील, अंबरिश घाटगे, चेतन नरके, सदानंद हत्तरकी, धनाजीराव देसाई, रविश पाटील-कौलवकर, प्रताप शंकरराव पाटील , प्रकाश चव्हाण, राजाराम भाटले, रणजित बाजीराव पाटील
इतर मागासवर्गीय गट :
विद्यमान संचालक पी. डी. धुंदरे
भटक्या विमुक्त जाती जमाती :
विद्यमान संचालक विश्वास जाधव
अनुसूचित जाती जमाती गट :
विलास कांबळे
महिला गट:
विद्यमान संचालिका अनुराधा पाटील, शौमिका महाडिक