राज्यात किमान ८० ते १०० मिलीमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं
मुंबई :
महाराष्ट्रात मान्सून केव्हा दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. तीन दिवस आधीच केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर, महाराष्ट्रात देखील वेळेआधीच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. पण वेळ निघून गेल्यानंतरही अद्याप महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं नाही. त्यामुळे हवामान विभाग पुन्हा एकदा तोंडघशी पडले. यानंतर आता आयएमडीने महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा नवा अंदाज काढला आहे.
हवामान विभागाकडून चुकणारे हवामान अंदाज आणि निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. राज्यात किमान ८० ते १०० मिलीमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं, असंही दादा भुसे यांनी सांगितलं आहे.
१२ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगळला असून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अडथळे निर्माण होत आहेत.
काही दिवसांत मान्सूनच्या आगमनासाठी महाराष्ट्रात पोषक हवामान तयार होईल, परिणामी १२ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल, अशी नवी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
K S Hosalikar
@Hosalikar_KS
7 Jun, 9.30 am Satellite obs:
Very light cloud cover over parts of Madhya Mah and around, KA too.
Mod to dense clouds observed over south peninsula, parts of east central arabian sea, LAK ares and around
महाराष्ट्रातील काही भागांत पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. तर आज मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात अंशत: ढगाळ हवामान निर्माण झालं आहे.