पंचायत विकास अधिकारी पद निर्मितीसाठी तज्ज्ञ समितीचे गठन

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. 10 :

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून होत होती. या अनुषंगाने उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक; मुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव; उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद, नाशिक; उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक; ग्रामसेवक एकनाथ पंढरीनाथ ढाकणे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे प्रतिनिधी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, नाशिक यांची सदस्य सचिवपदी नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ही समिती संबंधित पद निर्माण करण्याची आवश्यकता व त्याची कारणमिमांसा जाणून घेतील. त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण केल्यास अनुज्ञेय वेतनश्रेणीचा अभ्यास करतील. त्याचबरोबर वेतन, वेतनश्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि तद्षुंगिक बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्याच्या मुदतीमध्ये अहवाल सादर करणार आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!