आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सोलापूर शहर, दक्षिण, अक्कलकोट, मोहोळ तालुक्यातील शाळांना मल्टीफंक्शनल प्रिंटर वाटप
अल्पसंख्याक शाळांना 43 इंचीचा एलईडी टीव्हीचे वाटप
सोलापूर
आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक फंडातून आज सोलापूर शहर, दक्षिण, अक्कलकोट, मोहोळ तालुक्यातील माध्यमिळ शाळांना मल्टीफंक्शनल प्रिंटरचे वाटप करण्यात आले तसेच सोलापूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळांना 43 इंचीचा एलईडी टीव्ही देण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, आमदार झाल्यापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहे. आतापर्यंत माझा आमदार निधी शैक्षणिक साहित्यावर खर्च करून हजारो शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. वरिष्ठ व निवड श्रेणी, वेतन निश्चीती, वैयक्तिक मान्यता, संच मान्यता, सेवक संच, शालार्थ आयडी, मेडीकल बील आदी कामांकरीता शिक्षकांना शिक्षण विभागात वारंवार खेटे घालावे लागतात व त्यांची दमवणूक होते. याबाबत आपण ‘एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व’ हे धोरण राबवले असून शिक्षकांनी कधीही फोन करून मला काम सांगू शकता. विनाअनुदानित शाळांना अनुदान, टप्पावाढ, नवीन स्वयंअर्थसहायित शाळांना मान्यता, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती आदी प्रश्नांबाबत आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, प्राचार्य दत्तात्रय सुत्रावे, अल्पसंख्याक शिक्षण संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष वैजनाथ हतुरे, उपाध्यक्ष महेश सरवदे, मा. महापौर नलिनी चंदेले, श्रावण बिराजदार, आणासाहेब गायकवाड, विद्यानंद स्वामी, संतोष गायकवाड, कृष्णदेव बेहेरे , रामचंद्र जानकर, व्हनमाने सर यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.