आम्ही शाहू महाराजांच्या पाठीशी : संयोगिताराजे छत्रपती यांच्या प्रचार दौऱ्यात ग्रामस्थांचा निर्धार
कोल्हापूर :
राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरणाची उभारणी करून कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. उसाच्या पट्टा तयार होऊन साखर कारखाने उभे राहिले. आमची आर्थिक उन्नती होण्यात छत्रपती घराण्याचे मोठे उपकार आहेत. पाण्याची सोय करण्याबरोबर कृषी, शिक्षण, उद्योग, कुस्ती अशा प्रत्येक क्षेत्रात राजर्षी शाहू महाराजांना अतुल्य कार्य केले आहे. त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. आताचे विद्यमान अधिपती शाहू महाराज लोककल्याणास्तव लोकसभेला उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचा सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याचा समतेचा विचार घेऊन ते पुढे घेउन जात आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही आम्ही शाहू महाराजांच्या पाठीशी राहणार असल्याचा निर्धार
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या प्रचार दौऱ्यात ग्रामस्थांनी व्यक्त केला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे
इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा करवीर तालुक्यातील सडोली
खालसा जिल्हा परिषदेतील बाचणी, आरे, गाडेगोंडवाडी, कारभारवाडी, सडोली खालसा, हिरवडे खालसा गावचा प्रचार दौरा संपन्न झाला. यावेळी तेजस्विनी राहूल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी व आपल्या सर्वाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शाहू महाराजांना हात चिन्हासमोरचे बटन दाबून मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
दौऱ्यात प्रचार दौऱ्यात बाळासाहेब वरुटे, जयदीप मोहिते, संतोष पोर्लेकर, सरपंच दत्तात्रय कुबडे, उपसरपंच नंदिनी चौगले, राजू आडके (आरे), उमादेवी पाटील, सरपंच अमित पाटील, उपसरपंच तेजस्विनी पाटील, शैलजा कुरणे, करण पाटील, (सडोली खालसा), भोगावती कारखाना संचालक रघुनाथ जाधव, शिवाजी तळेकर, सरपंच अजय साळवी, शांताबाई परीट, सुशीला पाटील, आर आर पाटील, रघुनाथ पाटील, एम डी पाटील, विनायक तळेकर (बाचणी), वाय एस पाटील, राजाराम पाटील, उपसरपंच दीपमाला पाटील, पंचायत समितीच्या माजी सदस्यां सविता पाटील, राजाराम महादेव पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.