माजी सैनिक संघटना वेलफेअर असोसिएशन शाहू महाराजांच्या विजयासाठी कार्यरत राहणार : पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास( युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती यांनी साधला संवाद )

कोल्हापूर :

छत्रपती घराण्याने आर्मीसाठी मोठे योगदान दिले आहे. राजकारण म्हणून नव्हे तर छत्रपती उभे आहेत म्हणून त्यांच्यासाठी काम करणे आम्ही उत्तरदायित्व मानतो असे सांगून माजी सैनिक संघटना वेलफेअर असोसिएशन शाहू महाराजांच्या विजयासाठी कार्यरत राहणार असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

माजी सैनिक संघटना वेलफेअर असोसिएशन पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपती
महाराजांना विजयी करण्याचे आवाहन केले. संघटनेचे अध्यक्ष कर्नल विजयसिंह गायकवाड उपस्थित होते.

संघटनेचे उपाध्यक्ष निवृत्त सैनिक अधिकारी एन.एन.पाटील, जनरल सय्यद अजीम, कर्नल अमरसिंह सावंत, कर्नल विस्वेकर, सौ. वडणगेकर यांनी आपल्या भाषणात
राजर्षी शाहू महाराजांपासून ते आजतागायत छत्रपती घराणे आणि सैनिक, माजी सैनिक यांचे अतुट नाते कायम राहिले आहे. राजघराण्याने देशासाठी, समाजासाठी खूप केले आहे. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा घेऊन विद्यमान शाहू छत्रपतींनी सैनिकांना, माजी सैनिकांना सहकार्य करण्यात, आमचा सन्मान राखण्यात नेहमीच सक्रिय राहिले आहेत. शाहू छत्रपती हे अत्यन्त हुशार, प्रगल्भ विचाराचे लोकसभा उमेदवार असून खासदार म्हणून त्यांचे कार्य कोल्हापूरला लौकिक प्राप्त करून देणारे असेल असे सांगितले.

यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित सर्व माजी सैनिकांशी चर्चेद्वारे संवाद करत संघटनेचे कार्य व अडचणी जाणून घेतल्या. आजपर्यंत छत्रपती घराणे व आपल्यातील नाते यापुढेही कायम राहील. महाराज व आम्ही सर्व आपल्या संघटनेच्या ज्या न्याय्य मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा शब्द दिला. याप्रसंगी कर्नल अमर सावंत, कर्नल दिलीप मंडलिक, सुभेदार आनंदा पाटील, हवालदार गजानन पाटील, नाईक मारुती गजमाळे, नाईक प्रकाश खोजगे आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!