जिल्ह्याचा खुंटलेला विकास शाहू महाराज ताकदीने पुढे नेतील : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
(दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मनोरमानगर, राजलक्ष्मीनगर, पांडुरंग नगरी, श्रीकृष्ण कॉलनी परिसर भागात प्रचार दौरा )

कोल्हापूर :

राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारावर कोल्हापूरसह महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. मात्र याच कोल्हापुरात दंगली सारखा निंदनीय प्रकार घडला. हे प्रकार रोखायचे आहेत. आर्थिकतेबरोबर सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्याही समाज सक्षम बनविण्याची गरज आहे. सद्यपरिस्थितीत ही ताकद शाहू छत्रपती महाराज यांच्या आचार – विचारात आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा खुंटलेला विकास शाहू महाराज ताकदीने पुढे नेतील असा ठाम विश्वास युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील देवकर पाणंद व संभाजीनगर परिसरातील मनोरमानगर, राजलक्ष्मीनगर, पांडुरंग नगरी, श्रीकृष्ण कॉलनी परिसर भागात प्रचार दौरा संपन्न झाला. दौऱ्यात
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
यांनी प्रभागातील महिलांशी संवाद साधून त्यांचा अडचणी जाणून घेतल्या. तसेच भविष्यात विकासासाठी योग्य ते सहकार्य करण्याबाबत आश्वस्त केले.

यावेळी दिग्विजय मगदूम यांचेसह प्रभागातील विविध नागरिकांनी या निवडणुकीत शाहू छत्रपती महाराजाना कोणत्याही परिस्थितीत मताधिक्य देणार म्हणजे देणार असा ठाम मनोदय बोलून दाखविला.

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती पुढे म्हणाल्या,
राजर्षी शाहू महाराज यांनी राधानगरी धरण, शाहू मिल, उद्योग -व्यवसाय, शिक्षण, कुस्ती, कृषी, व्यापार अशा अनेक क्षेत्रात भरीव योगदान दिले. आज ही छत्रपती घराणे त्याच विचाराने सामाजिक कार्यात, जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत अग्रेसरच राहिले आहे. संभाजीराजे छत्रपती यांचे गडकोट किल्ले संवर्धनाचे काम सर्वश्रुत आहे तसेच कोल्हापूर गॅस पाईपलाईन, महापुरात एनडीआरएफ च्या तुकड्या आणण्याचे काम, शिवाजी पूल, विमानतळ, रेल्वे स्टेशन, हॉकी स्टेडियमच्या बाबतीत त्यांनी केलेला पाठपुरावा भरीव असाच आहे. अडचणीच्या काळी पोटतिडकीने पुढे येणारे छत्रपती घराणे आहे. त्यामुळे कोण योग्य आहे हे ओळखून शाहू महाराजांना संसदेत पाठवावे असे आवाहनही केले.

दौऱ्यात नगरसेवक दीपा मगदूम, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम, रोहिणी सावंत, रोहिणी साळुंखे, प्रियांका पाटील,शहाजी पाटील,राहुल सावंत, उमेश सावंत, रवींद्र साळुंखे (मनोरमा नगर ), कलगोंडा अण्णा पाटील, सुरेंद्र कुलकर्णी, दीपक गुंडप, शामराव चौगुले, आनंत पाटील, पी.जी. शिवलकर, गजानन सरनाईक, मधुकर कुंभार (राजलक्ष्मी नगर ), कृष्णात पवार, शिवाजीराव गुजर, केशव पाटील, राजाराम सावर्डेकर, पांडुरंग सुतार, तुकाराम पाटील, मालती सुतार, सुमन पवार,विजयमाला पवार, उमा देसाई, अलका खेतल, निहाल मानसिंग पवार (पांडुरंग नगरी देवकर पाणंद ), दिपाली चौगुले, सुजाता पाटील, सुभाष नाईक, महादेव पाटील, दत्ताजीराव देसाई, संभाजी जाधव, दत्ता बामणे, जयवंत पाटील, वैभव चौगुले, एड.नरेंद्र देसाई (श्रीकृष्ण कॉलनी ), सिद्धार्थ पावसकर, जगदीश पाटील, आकाश संकपाळ, अक्षय चौधरी, सविता पाटील, अनिता पावसकर, सुनीता राऊत श्रीकृष्ण कॉलनी यांचेसह नागरिक, महिला, युवक, युवती, कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!