युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींची श्री शाहू छत्रपती मध्यवर्ती प्रचार कार्यालयाला भेट : कार्यकर्त्यांना केल्या सूचना
कोल्हापूर :
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी शाहू स्टेडियमजवळील श्री शाहू छत्रपती मध्यवर्ती प्रचार कार्यालयाला भेट कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कार्यालयातून सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी येत्या दोन दिवसांमध्ये घ्यावयाच्या दक्षते संदर्भात, राबवायच्या प्रभावी प्रचार यंत्रणेबाबत आवश्यक सूचना केल्या.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर येथे मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरु करण्यात आले होते. तेव्हापासून कार्यालयात कार्यकर्त्यांची रेलचेल दररोज सुरु आहे. आज रविवारी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी कार्यालयाला भेट देऊन सर्वांशी सविस्तर चर्चा केली आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. माजी नगरसेवक विनायक फाळके यांनी युवराज्ञी संयोगितराजे छत्रपतींचे स्वागत केले.
यावेळी माजी नगरसेवक विनायक फाळके, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक धनंजय सावंत, प्रवीण पवार, हेमंत साळूंखे, खाटीक समाजाचे माजी अध्यक्ष विजय कांबळे, सोनल घोटणे, महेश शिंदे, अनिल आदिक, रोहन घोरपडे, अजित पाटील, संदीप देसाई, संदीप जाधव, युवराज पाटील, अमोल बलुगडे, धीरज बलुगडे, अमित भोसले, निशिकांत बागणीकर, प्रदीप गोते, अक्षय पाटील, मनीष काटे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.