शेतकऱ्यांऐवजी  उद्योगपतींवर मर्जी असणारे सरकार खाली खेचा : संभाजीराजे छत्रपती ( धामोड येथील जाहीर सभेला मोठी गर्दी ) 

राधानगरी : 

  गतवेळचा १५ लाखाचा चुनावी जुमला,  दोन कोटी लोकांना रोजगार, मेक इन इंडिया त्याचे काय झाले? आणि आता नवीनच जाहीरनामा प्रसिद्ध करुन खोट्या चुनावी जुमल्यांची आश्वासने भाजप देत आहे. महागाईमुळे शेतकऱ्यांना शेती करणे जिकिरीचे झाले आहे. हमीभाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर दडपशाही केली जाते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघायला, त्यावर बोलायला सरकारला वेळ नाही. शेतकऱ्यांऐवजी  उद्योगपतींवर मर्जी असणारे हे सरकार खाली खेचा, असा घणाघात संभाजीराजे छत्रपती यांनी केला. 

 धामोड (ता.राधानगरी) येथे शाहू  छत्रपती महाराज यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी संभाजीराजेंनी,  राजर्षी शाहू महाराज आणि राधानगरी तालुक्याचे अतुट नाते होते.त्यांच्या दुरदृष्टी मुळे हा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. राजर्षी शाहु महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी व कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शाहु छत्रपतींना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. 

शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले,  भारताची सद्यस्थिती बदलली पाहिजे. आपणांस आश्वासन देत फसवले त्या विरोधात आवाज उठवण्याची वेळ आली.  ज्याच्या हातात आता सत्ता त्यांनी शेतकरी, महिला, तरुणांना आश्वासन दिली पण वास्तविक काहीच केले नाही. त्यांना दूर करावे लागेल. मोदीजी खोटी गॅरंटी  चालणार नाही. लोकांना फसवले. त्यांना थांबविले पाहिजे. 

ए. वाय. पाटील म्हणाले, कोल्हापूर हा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याने प्रेरित जिल्हा आहे.  त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. विद्यमान शाहू छत्रपती त्याच विचाराने जनतेसाठी कार्य करत आहेत. अनेक गावांत अडचणी असलेल्या लोकांना त्यांनी मोफत जमिनी दिल्या मात्र त्याची कधीच वाच्यता केली नाही, हा मनाचा मोठेपणा फक्त राजाच दाखवू शकतो. त्यांच्या समाजकारणाला अधिक ताकद देण्यासाठी सर्वजण त्यांना दिल्लीत पाठवूया. 

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले, गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंदरे , भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले , जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील , सागर धुंदरे, उत्तम पाटील, बी. के. डोंगळे ,  वंचितचे सागर कांबळे,  पांडुरंग भांदीगरे, धिरज डोंगळे, दगडु चौगले,  जयसिंग खामकर,  एम डी खडके, ए डी  चौगले,  एल एस पाटील, मधुकर रामाणे,  पंचक्रोशितील हजारो नागरिक उपस्थित होते.

गद्दारांना धडा शिकवा : 

देशात ते चारशेपार म्हणत असले, तरी भाजप दोनशे देखील पार करणार नाही. भाजपला, गद्दारांना, महाराष्ट्र व्देष करणा-यांना मतदान करणार नाही, ही भूमिका आज मतदार घेत आहेत. तुमचे एक मत इतिहास घडविणारे आणि देशातील सरकार बदलणारे ठरणार आहे. गद्दारी करुन उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या खोके व निष्क्रीय विद्यमान खासदाराना घरी बसवुन धडा शिकवा.

—  सुनिल शिंत्रे  (शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख) 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!