जनतेचा उत्साह पाहता शाहू छत्रपती महाराजांचा
मताधिक्क्याने विजय निश्चित : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती ( शेवटच्या क्षणापर्यंत सतर्क राहण्याचे आवाहन )
राधानगरी :
लोकसभेचे उमेदवार शाहू छत्रपती महाराजांना सगळीकडे ग्रामस्थांचा, महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावागावांत लोक शाहू छत्रपतींना दिल्लीत पाठवणारच असा निर्धार करत आहेत. शेतकरी महाराजांच्या सोबत आहेत. लोकांचा हा उत्साह पाहता या निवडणुकीत शाहू छत्रपतींचा मताधिक्क्याने विजय निश्चित आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सतर्क राहा, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
यांनी केले.
लोकसभेचे उमेदवार शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारानिमित्त युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
यांनी राधानगरी तालुक्यातील मालवे, मांगोली, आकनूर, मांगेवाडी, सुळंबी, चक्रेश्वरवाडी गावांचा प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी छत्रपती घराणे कायम तुमच्यासोबत राहणार असल्याचा शब्द दिला.
गोकुळचे संचालक व बिद्रीचे संचालक आर.के.मोरे म्हणाले, या देशात जेवढ्या म्हणून क्रांत्या झाल्या त्या काँग्रेस सरकारच्या काळतच झाल्या आहेत. शाहू छत्रपती हे जनतेचे उमेदवार आहेत. विरोधकांनी त्यांच्याविरोधात बोलताना अभ्यास करून बोलावे.भाजपने विकासकामापेक्षा दुसऱ्याची घरे फोडण्याचे काम केले
आर.वाय.पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता निवडणुकीत काही अडचण येणार नाही. या भागात सर्व गटातटाची मंडळी एकत्र येऊन काम करत आहेत. ही निवडणूक अगदी गावपातळीवरची आहे असे समजून सर्वजण कामाला लागू. जागरूकतेने काम करू.
दिप्ती चौगले म्हणाल्या, राजर्षीमुळे राधानगरीचा शिवार जलयुक्त झाला. तालुक्याचे नंदनवन झाले. आजही छत्रपती घराण्याचे विविध क्षेत्रातील योगदान भरीव असेच सुरु आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिक अहोरात्र कष्ट घेणार आहेत. महिलांप्रति प्रचंड आदर असलेले उमेदवार शाहू महाराज जनमाणसाचा आवाज बनले आहेत.
यावेळी अर्चना ए. पाटील, बिद्रीचे संचालक डी एस पाटील, सुरेश चौगले, संजय कांबळे, नेताजी पाटील सुनील चौगले, संग्राम कदम, विजयमाला पाटील, एस डी पाटील, शैलजा कांबळे, अशोक पाटील, एस के पाटील, ए एल पाटील, युवराज पाटील, संभाजी जाधव, टी ए मगदूम, अर्चना पाटील, अंतूमामा सावंत, संजय पाटील, जोतिराम सावंत, राजेंद्र पाटील, संजय कांबळे, दत्तात्रय कांबळे, एन डी मोरे, ए के जाधव, सखाराम पाटील, हिंदुराव जाधव, के डी पाटील, आनंदा बरगे, सरपंच सदाशिव भांदिगरे, साताप्पा नरके, पांडुरंग पाटील, शंकर नरके, युवराज कुसाळे, दयानंद बारड, कमल शिर्के, वनिता कुसाळे, छाया कुसाळे आदीसह गावागावातील कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.