कोल्हापूरच्या जनतेला आता बदल हवाय : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
(चंदगड तालुक्यातील कडलगे, नागरदळे, सुंडी, करेकुंडी, कौलगे, होसूर, कल्याणपूर, कुदनूर येथे प्रचार दौरा)

चंदगड :

सर्वांच्या आग्रहास्तव समाजहीत पाहून, शिव- शाहू- फुले – आंबेडकरांचे समतेचे विचार पुढे नेण्यासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी शाहू छत्रपती महाराज निवडणुकीला उभे आहेत. जनतेला कोल्हापूरचा आवाज शाहू छत्रपतींच्या रूपाने दिल्लीत पाठवायचा आहे. त्यासाठी सगळीकडे जनता मोठ्या उत्साहाने प्रचारात उतरली आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी जनतेला आता बदल हवाय, त्यामुळे बदल निश्चित आहे, असा आत्मविश्वास युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी चंदगड तालुक्यातील गाव टू गाव प्रचार दौरा करून ग्रामस्थ, महिला यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना विजयी करण्याचे आवाहन केले. छत्रपती घराण्याची सून आपल्या गावी आल्याने ग्रामस्थांनी, विशेषत: महिलांनी मोठ्या कुतूहलाने संयोगिताराजे छत्रपतींचे स्वागत केले.

डॉ. नंदाताई बाभुळकर म्हणाले, गेल्या अडीच वर्षात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका झालेल्या नाहीत, ही हुकूमशाहीची सुरुवातच आहे . आता जर भाजप सत्तेत आले तर कदाचित ही शेवटची निवडणूक ठरेल. लोकशाही संपुष्टात येईल. हे सरकार शेतकऱ्यांचे नव्हे तर बड्या उद्योपतींचे आहे.

शीतल पाटील म्हणाल्या, उमेदवार शाहू छत्रपती महाराज हे सर्वसामान्यांना आपले वाटणारे नेतृत्व आहे. ते केवळ तुमच्याआमच्यासाठी उभे आहेत. त्यामुळे सर्वांनी स्वतःची जबाबदारी समजून महाराजांच्या विजयासाठी कामाला लागूया.

माजी जि. प. सदस्या सुजाता पाटील म्हणाल्या, भाजपने महिला, शेतकरी यांना फसविण्याचे काम केले आहे. काँग्रेस हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. चंदगडमध्ये घराघरात पोहचून महाराजांना लीड देऊ.

यावेळी माजी जि. प. सदस्य एम.जे.पाटील, कल्लापाण्णा भोगण, माजी पं.स.सदस्या नंदिनी पाटील, कोवाड सरपंच अनिता भोगण, पै. विष्णु जोशीलकर, लक्ष्मण मनवाडकर, शांताताई जाधव, माजी सरपंच सुधीर गिरी, वसंत पाटील, सरपंच दिलीप पाटील, श्रीकांत पाटील, श्रीकांत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष कुंडलिक पाटील, वसंत देसाई, वाकोबा पाटील, सरपंच पूनम पावले, उपसरपंच सुरेश चव्हाण, रमेश पावले, शिवाजी केदनरकर, सरपंच प्रकाश केदनूरकर, भीमराव आतवाडकर, सरपंच राजाराम नाईक, उपसरपंच छाया पाटील, सुबराव पवार, बंडू पाटील, रेणुका पाटील, बाजीराव पाटील, अनिता दिग्विजय जाधव सरकार, रसूल उस्ताद, सिद्धाप्पा नागरदरेकर, संजय जाधव, गणपती आंबेवाडकर, चंद्रकांत कांबळे यांचेसह कडलगे, नागरदळे, सुंडी, करेकुंडी, कौलगे, होसूर, कल्याणपूर, कुदनूर येथील कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!