भाजपचे फसवे सरकार पराभूत करा : डॉ. नंदाताई बाभुळकर ( चंदगड तालुक्यात संयोगिताराजे छत्रपती यांचा प्रचार दौरा)

चंदगड :

शेजारच्या कर्नाटकमध्ये काँग्रेसने जाहीर नाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसने गरीब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देण्याचे दिलेले जाहीरनामाही पूर्ण करणार यात शंकाच नाही. याऊलट भाजप सरकार हे भूलथापा मारून सत्तेवर आले आहे. काजूचे दर १६०, १४० रुपयेवरून ८० रुपयेवर खाली आले. गॅसचे दर ४०० वरुन ११०० झाले. खतांचे दरात मोठी वाढ केली. विजेच्या दरात १२ टक्के वाढ होणार आहे. भाजपचे
भाजपचे फसवे सरकार पराभूत करा, असे आवाहन डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे
इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी चंदगड तालुक्यातील मलगेवाडी, बोंजुर्डी, अडकूर, गणुचीवाडी गावांचा दौरा केला. गावागावांत महिलांनी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी त्यांनी महिलांशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा, मनमोकळ्या गप्पा मारल्या. युवराज्ञी संयोगिताराजे यांनी अडकूर येथे बबनराव देसाई, बाबा अडकूरकर, जयवंत अडकूरकर, रत्नप्रभा अडकूरकर, राहुल देसाई अडकूरकर, धोंडीबा दळवी, डॉ. मलिक बाबालाल चिंचणेकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या, शिव- शाहुंचा विचार घेऊन, त्यांचा दूरदृष्टीकोण घेऊन लोकाग्रहास्तव महाविकास व इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज निवडणुकीला उभे आहेत. महाराजांना अभ्यास, अनुभव हा चंदगडच्या विकासाला नक्कीच गती देईल, हा विश्वास देतो. चंदगडकरांनी शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे.

प्रचार दौऱ्यास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, राजश्री तात्यासाहेब देसाई, माजी पंचायत समिती सदस्या विद्या विलास पाटील, माजी पंचायत समिती सदस्या रूपाताई खाण्डेकर, नंदिनी पाटील, कोवाड सरपंच अनिता भोगण, संतोष सुतार, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अनिल दळवी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, तालुका युवक अध्यक्ष नितीन फाटक, महिला तालुकाध्यक्षा दीपा पाटील, शांता जाधव, डॉ. विजयकुमार कांबळे, अशोक जाधव, सागर पाटील, राहुल देसाई, राधिका शिवगोंडे, साधना शिवगोंडे, सारिका पाटील सरपंच बोंजुर्डी, संगीता गुडवळेकर , सुलाबाई सुतार, डॉ. सदानंद गावडे, सूरज माने, एकनाथ वाके, गणेश बागडी, संतोष पाटील आदीसह कार्यकर्ते, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!