सहाशे वीस कोटीचा थेट गॅस पाइपलाइन प्रकल्प संभाजीराजेंनी आणला : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
कोल्हापूर : महिला वर्गाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या थेट गॅस पाइपलाइनचा प्रकल्प संभाजीराजे छत्रपतींनी कोल्हापुरात आणला .केलेल्या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा जनतेची सोय कशी होईल यावर राजपरिवारातील प्रत्येक सदस्य भर देत असल्याने संभाजीराजेंनी या गोष्टीचे भांडवल केले नाही,अशी माहिती युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यानी येथे बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक प्रकाश पाटील ,विनायक फ़ाळके ,कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सौ. सरलाताई पाटील ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेश बराले ,शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रवी चौगले यांच्या पुढाकाराने रुईकर कॉलनी परिसरात कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांच्या प्रचारार्थ मतदारांच्या गाठीभेटी आणि सुसंवाद मोहिमेद्वारे संयोगिताराजे छत्रपती यांनी आपली भूमिका पटवून देत मतदारांशी संवाद साधला.
यावेळी संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या ,’केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकड़े सातत्याने पाठपुरावा करुन संभाजीराजेंनी तब्बल सहाशे वीस कोटी रूपयांच्या खर्चाचा थेट गॅस पाइपलाइन प्रकल्प कोल्हापूरसाठी मंजूर करुन आणला आहे. .सर्वसामान्य गृहिणीना गॅस सिलेंडरचे बुकिंग ,प्रतीक्षा ,वेळ पडल्यास रांगेत थांबुन सिलेंडर आणणे या त्रासातून यामुळे मुक्ति मिळेल.या गॅस पाइपलाइन जोड़णीचे काम बहुतांश ठिकाणी पूर्ण झाले असून लवकरच आता थेट स्वयंपाकघरात घरगुती गॅस पोहोचनार आहे .पण या कामाच्या श्रेयवादात संभाजीराजे पडलेले नाहीत . राजपरिवारातील शाहू महाराजांसह कोणीच कामाच्या श्रेयवादापेक्षा कामाच्या पूर्ततेवर भर देत आल्याने कोणालाच याची माहिती नाही .
माजी नगरसेवक प्रकाश पाटील यानी देशाचे संविधान संकटात असल्याने आम्ही राजकीय भूमिकेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघापुरता बदल केला असल्याचे सांगून कोल्हापुरची अस्मिता असलेल्या निगर्वी आणि बोलन्यापेक्षा कृतीवर भर देणाऱ्या शाहू महाराजांना संसदेत पाठवण्याची जबाबदारी स्वीकारुन पूर्ण क्षमतेने कार्यरत झालो आहोत, असे सांगितले.
रेशमा चांदणे यानी सद्य: स्थिती पाहता यावर्षीची महामानव ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्हाला साजरी करता आली, पण केंद्रातील प्रतिगामी आणि मनुवादी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास पुढच्या वर्षी ही जयंती साजरी करण्याचीही संधी मिळणार नसल्याची भीती व्यक्त करत हे मनुवादी सरकार पराभूत करण्यासाठीचा एक भाग म्हणून इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडीचे सर्वमान्य आणि कृतीशील उमेदवार म्हणून पुढे आलेल्या शाहू महाराजांना खासदार म्हणून निवडून आणायला पाहिजे असे मत व्यक्त केले.
कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सौ सरलाताई पाटील यांनी देशासमोर अराजकता आणि जातीयवादी प्रवृत्तीनी निर्माण केलेला धोका पाहता आता सत्ताबदल अटळ असून महिला वर्गाने पुढाकार घेऊन भाजपला हद्दपार करण्यासाठी आपल्या मताधिकाराचे कर्तव्य बजावून इंडिया आघाडीचे उमेदवार असलेल्या शाहू महाराजांच्या विजयासाठी हातभार लावावे ,असे आवाहन केले.
यावेळी माजी नगरसेवक महेश बरले ,तौफीक मुल्लाणी,उद्योजक संदिप मिरजे ,डॉ विजय मुळीक ,अमरदीप पाटील,कृष्णन परमेश्वरण ,प्रीतम पाटील ,पृथ्वी पाटील,प्रसाद पाटील , कल्याणी पाटील,राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस च्या जिल्हाध्यक्षा सायली महाड़िक ,शोभा अरविंद ,सविता तोरणे ,नेत्राली देसाई ,शोभा कृष्णन ,राधिका देसाई ,वैशाली पाटील,माधुरी चव्हाण ,लक्ष्मी कृष्णन,जयश्री पाटील, राजश्री पोवार ,इंदिरा चौगले,शोभा कृष्णन, आदि मान्यवर उपस्थित होते.