ज्या ज्या वेळी समाजाला गरज पडेल त्या त्या वेळी छत्रपती घराणे पुढे आले : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती (करवीर तालुक्यातील परिते जिल्हा परिषद मतदारसंघातील पिरवाडी, वाशी, नंदवाळ, शेळकेवाडी, कांडगाव, जैताळ, देवाळे दौरा)
कोल्हापूर :
परकीय सत्ता, जुलमी राजवटीतून रयतेची सुटका करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले. पुढे करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांनी बलाढ्य शक्तीशी झुंज दिली. त्यानंतर समाजातील अनिष्ट प्रथा, जातीपातीला बाजूला सारून बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून समतेचा विचार राजर्षी शाहू महाराजांनी दिला. आज समाजात पुन्हा अस्थिरतेचे वातावरण तयार होत आहे, जातीजातीत द्वेष पसरवीला जात आहे, जातीय दंगली होऊ लागल्या आहेत, समाज भयभीत होत आहे , अशा वेळी समाजाला शिवशाहूंच्या विचारांची गरज आहे. त्यामुळे समाजहितासाठी छत्रपती घराणे पुढे आले असून शाहू छत्रपती महाराज लोकसभेला उभे राहिले आहेत, असे प्रतिपादन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा करवीर तालुक्यातील परिते जिल्हा परिषदेतील पिरवाडी, वाशी, नंदवाळ, शेळकेवाडी, कांडगाव, जैताळ, गावांतील दौऱ्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होत्या.
यावेळी तेजस्विनी राहूल पाटील म्हणाल्या, छत्रपती घराण्याचे कार्य सर्वव्यापी आहेत. राजर्षी शाहू राजानी केलेल्या कार्यातून उताराई होण्याची एक संधी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. सर्वांनी गटतट विसरून हात चिन्हावर बटण दाबून शाहू महाराजाना मोठे मताधिक्क्य देऊया आणि दिल्लीला पाठवूया.
दौऱ्याप्रसंगी विजयसिंह इंगळे, माजी सभापती अश्विनी धोत्रे, सरपंच शुभांगी मिठारी, उपसरपंच यशवंत सातपुते, ग्रा प सदस्य अनिता खोत, अनिता रावळ, मेघा खोत, कृष्णात धोत्रे, सुनील खोत, विलास पोवार, साताप्पा लाड, निलेश खोत दिंगबर हराळे ( पिरवाडी )
आप्पासो हजारे, सरपंच संतोष जाधव, दत्तात्रय हजारे, संभाजी पाटील, एम बी पाटील, आण्णा बुडके संजय पाटील, श्रीधर कांबळे ( वाशी ), भोगावती कारखाना संचालक बी. ए. पाटील, बबन रानगे, अनिता पाटील, सुवर्णा रानगे, माजी सरपंच तुळसाबाई कुंभार, कृष्णात मेटील, योगेश कांबळे, एम एस पाटील, विजयश्री पाटील, वैशाली पाटील, दिंगबर पाटील (वाशी), हनुमान तालीम मंडळाचे अध्यक्ष यशवंत भाऊ सावर्डे, उपाध्यक्ष सुभाष रुमाले, सरपंच अमर कुंभार, उपसरपंच सचिन कोंडेकर, साविता निकम, उज्वला गुरव, सुभाष पाटील, विनायक शिंदे, युवराज उलपे, सूरज उलपे, भिकाजी कांबळे, तानाजी कांबळे, मच्छिन्द्र काकते, अक्षय केनवडे (नंदवाळ ), रंगराव शेळके, जे के शेळके, मानसिंग शेळके, सुनील शेळके, सरपंच तेजश्री शेळके, सरिता सुनील शेळके, अक्षय शेळके, चंदर शेळके( शेळकेवाडी),
दिंगबर मेडसिंगे, माजी सरपंच रुपाली बाबासो मेडसिंगे, रुपालीताई दि. मेडसिंगे, संभाजी मेडसिंगे, प्रताप पाटील, आनंदराव मगदूम, अनिल मानकर, सुजाता नाईक, मगदूम वहिनी (कांडगाव), सरपंच नीता पाटील, उपसरपंच दीपक कांबळे, प्रकाश पाटील, एम के पाटील, विठ्ठल पाटील, किशोर पाटील, शोभा पाटील, वैशाली पाटील, माया कांबळे (जैताळ )
भोगावती कारखान्याचे चेअरमन एस ए पाटील, प्रा. निवास मारुती पाटील, निवास पाटील, विकास पाटील, सरपंच रुपाली सर्जेराव पाटील, उपसरपंच संभाजी सुतार, सर्जेराव पाटील निवास बाजीराव पाटील, अशोक धुमाळ, तानाजी पुढारी (देवाळे) यांच्यासह प्रचार दौऱ्यात ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.