शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ संभाजीराजे छत्रपती यांचा गडहिंग्लज तालुक्यात प्रचाराचा धडाका : ‘ गाव टू गाव ‘ प्रचार ( आज कडगाव – कौलगे विभाग दौरा) 

गडहिंग्लज : 

महाविकास  व इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ संभाजीराजे छत्रपती जिल्ह्यातील ग्रामीण भाग पिंजून काढत आहेत. सध्या ते गडहिंग्लज  तालुका दौऱ्यावर असून त्यांचा प्रचाराचा धडाका सुरु आहे. दौऱ्यात संभाजीराजे छत्रपती गडहिंग्लज तालुक्यातील ‘ गाव टू गाव ‘ प्रचार करत आहेत.जनतेशी संवाद साधून शाहू छत्रपती यांच्या हात चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना  विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. 

काल बुधवारी संभाजीराजे छत्रपती यांनी गडहिंग्लज, अरळगुंडी,कडलगे,  इदरगुच्ची,चंदनकुड,  हलकर्णी, बसर्गे, खणदाळ, नांगनूर, येनेचेवाडी, नौकूड, नंदनवाड, कुंबळहाळ, मनवाड, नरेवाडी, तुपूरवाडी, हिडदुग्गी, हसूरसासगिरी, हसूरवाडी या हलकर्णी परिसरातील गावचा दौरा पूर्ण केला. 

दौऱ्यात  अप्पी पाटील, गोपाळराव पाटील, शिवप्रसाद तेली, रामराज कुपेकर, अमर चव्हाण, सुनील शिंत्रे, विद्याधर गुरबे, सोमनाथ आरबोळे, दिलीप माने, स्वराज्यचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, यांचेसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते. 

आज गुरुवारी  (दि.१८) ते कडगाव – कौलगे विभागातील वडरगे, लिंगनुर, क॥ नूल, बेकनाळ, कडगाव, जखेवाडी, शिप्पूर, करंबळी, हिरलगे, कौलगे, ऐनापूर, इंचनाळ, बेळगुंदी,गिजवणे,अत्याळ गावातील दौरा करणार आहेत. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!