शाहू महाराजांचे मताधिक्य वाढविण्यात चंदगड तालुक्याचा मोठा वाटा असेल : संभाजीराजे छत्रपती
चंदगड :
छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारानिमित्त संभाजीराजे तीन दिवसीय चंदगड तालुका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अडकूर, तुडीये व माणगाव जिल्हा परिषद गटातील सर्व गावांसह एकूण पंचाहत्तर गावांचा दौरा केला. प्रत्येक गावात संभाजीराजे यांच्या कोपरा सभांसह, प्रमुख मंडळींच्या गाठीभेटी व बैठका संपन्न झाल्या.
आज माणगाव येथे बोलत असताना संभाजीराजे म्हणाले की, २००९ साली मी लोकसभेला उभा असताना चंदगड तालुक्याने मला सर्वाधिक मताधिक्य दिले होते. आता देखील मी चंदगडच्या दौऱ्यावर असताना जनता तितकाच उत्साही प्रतिसाद देत आहे. चंदगड तालुक्याचा हा प्रतिसाद शाहू महाराजांचे मताधिक्य वाढविणारा असेल, असा विश्वास व्यक्त करीत चंदगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी स्वतः कटिबद्ध असेन, अशी ग्वाही यावेळी संभाजीराजे यांनी दिली.
या दौऱ्यात गोपाळराव पाटील, नंदाताई बाभुळकर, ‘स्वराज्य’चे संजय पोवार, विष्णू जोशीलकर, विशाल पाटील, एम जी पाटील, जे के पाटील, नितीन पाटील, शिवाजीराव सावंत, संजय पाटील, तात्यासाहेब देसाई, विलास पाटील यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.