संविधान वाचविण्यासाठी शाहू महाराजांना विजयी करा : आमदार पी. एन. पाटील सडोलीकर (सातार्डे, पडळ, माजगाव, माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे गावचा संपर्क दौरा )
कोल्हापूर :
राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जातीधर्माच्या समाजाला एकत्र घेऊन त्यांच्या उन्नतीसाठी कार्य केले. शाहू – फुले – आंबेडकर यांच्या कार्यातून समतेचा विचार रुजू लागला. मात्र भाजपच्या हुकूमशाही धोरणामुळे देशाचे संविधान धोक्यात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा प्रवृत्तीला रोखायचे असेल तर समतेचा विचार पुढे घेऊन जाणारे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज संसदेत जाणे गरजेचे आहे. संविधान वाचविण्यासाठी शाहू महाराजांना विजयी करा, असे प्रतिपादन आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांनी केले.
महाविकास आघाडीचे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ आमदार पी.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघातील पडळ (ता. पन्हाळा) येथील संपर्क दौऱ्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार पाटील यांनी सातार्डे, पडळ, माजगाव, माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे गावचा संपर्क दौरा केला.
आमदार पी.एन.पाटील पुढे म्हणाले, देशाला पायाभूत विकासापासून आधुनिकतेपर्यंत नेण्याचे काम खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षानेचं केले आहे. मात्र, सध्या देशात खोटी आश्वासने देऊन जनतेला फसवण्याचे
खोटी आश्वासने देऊन जनतेला फसवण्याचे
काम सुरू आहे. पंचवीस वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसला उमेदवारी मिळाली आहे. सर्वांनी मोठ्या मताधिक्याने शाहू महाराजाना विजयी करण्यासाठी कामाला लागावे.
यावेळी माजी उपसरपंच दिलीप अतिग्रे, राहुल पवार, माजी उपसरपंच दिंगबर शिंदे, हिंदुराव पाटील, राजू बोरगे, उपसरपंच नवनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य अवधूत मोहिते, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, मार्केट कमिटी सभापती भारत पाटील भुयेकर, शंकरराव पाटील शशिकांत आडनाईक, शाहू काटकर,भरत मोरे, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत सागर कापसे यांनी केले तर आभार राजू बोरगे यांनी मानले.